स्थलांतरित नागरिक सहन करतायत नरक यतना..
महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना दिले निवेदन !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ ऑक्टोंबर – प्रभाग २६ मधील दुर्लक्षित पंचवटी नगर येथे राहणाऱ्या अवती नगर येथील स्थलांतरित नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून नरक यातना भोगत आहेत. सदरचे नागरिक एस.आर. मपी कॅम्प वर्षापासून वास्तवास असून त्यांना मूलभूत सुविधा ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, दिवाबत्ती, अंतर्गत रस्ते ह्या सुविधा अद्याप पर्यंत झालेल्या नसल्याने विकासापासून वंचित आहेत.
या समस्यांबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. तरीही याबाबत उपाय योजना झाली नसल्याने शेवटी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन सादर केले. यासंबंधी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी उपाययोजना करू असे ठोस आश्वासन दिलेले आहे. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.