महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याची दहीहंडी…..फोडली राष्ट्रवादीने दिल्या जबर घोषणा….

राष्ट्रवादीने फोडली महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याची दहीहंडी…..

विविध घोषणा देत नोंदवला निषेध…..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि. २७ ऑगस्ट – सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सात रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळे कारनाम्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी दहीहंडी फोडून निषेध नोंदवला. विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनाम्याचे पत्रक आणि काळे फुगे वाटण्यात आले…

यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, यू एन बेरीया, जनार्दन कारमपुरी, प्रशांत बाबर, सर्फराज शेख, चंद्रकांत पवार, मिलिंद गोरे, अजित बनसोडे, सनी म्हेत्रे, शक्ती कटकदौंड, अक्षय जाधव, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, रेखा सपाटे, वंदना भिसे, सिया मुलाणी, कविता कोडवाल, गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये…

राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई वाढली असून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत ते जनतेला आम्ही देत आहोत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असे आवाहन केले आहे.

– प्रमोद गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

काळे कारनामे उघड…

राज्य शासनाने जनतेच्या तोंडाला फसव्या योजनेतून पाने पुसले आहेत. भ्रष्ट सरकारची कारनामे उघड करण्यासाठी दहीहांडी फोडली आहे.यापुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन करून सरकारच्या काळ्या करणाम्यांचा निषेध करत राहू.

– प्रशांत बाबर, राष्ट्रवादी पवार गट युवक प्रदेश उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *