छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून द्या… राष्ट्रवादीची मागणी

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना दिले निवेदन…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २६ जुलै – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

दरम्यान सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथील एमआरआय मशीन कालबाह्य झालेली आहे. सोलापूर शहर हे गोरगरीब कामगार कष्टकरी मध्यमवर्गीयांचे शहर असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या उपचारासाठी कालबाह्य एम.आर. आय मशीनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे शासकीय रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशनीची अत्यंत गरज असून त्याकरिता नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर सोलापूर शहरातील अनेक उद्योगपती सी.एस.आर फंडातून शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता इच्छुक असून त्याकरिता शासनाची मान्यता लागते या मान्यतासाठी दिरंगाई होत आहे तरी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सीएसआर फंड वापरण्याकरिता मान्यता मिळवून द्यावी अशा आशयाचे निवेदन मंत्री मुश्रीफ यांना दिले असता त्यांनी तात्काळ

सोलापूरचे आधिष्ठाता संजीव ठाकूर यांना सूचना केल्या सीएसआर फंड वापरण्याची मागणी असेल तर प्रस्ताव पाठवून द्यावेत त्याला शासनाकडून तात्काळ मान्यता दिली जाईल तसेच नवीन एम आर आय मशीनसाठी ही प्रस्ताव द्यावा डीपीडीसी किंवा राज्य शासनाच्या निधीतून लवकरात लवकर एम आर आय मशीन उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण ज्येष्ठ नेते शफी इनामदार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम अँड,सलीम नदाफ युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय सेवा अध्यक्ष बसवराज कोळी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *