सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाची साधली वेळ….

मातोश्री कारखान्याच्या प्रलंबित ऊस देयकासाठी शेतकऱ्यांचा काँग्रेसभवन समोर ठिय्या…
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर , दि. ४ सप्टेंबर – काँग्रेसचे माजी गृराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्यात गाळपासाठी दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित देयकासाठी पुन्हा एकदा सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान बुधवार ( दी. ४ ) सप्टेंबर हा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस असून नेमक्या दिवशी शेतकऱ्यांनी काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट ठरली आहे. मातोश्री कारखान्यात गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना सिद्धाराम म्हेत्रे यांनी टनाला २७०० भाव जाहीर केला आहे.
ठराविक शेतकऱ्यांना पाचशे रू आणि काहींना सातशे रू याप्रमाणे बँकेच्या खात्यात रक्कम जमा केले आहेत. मात्र मागील आठ महिन्यांपासून एक रुपयाही खात्यामध्ये जमा केलेला नाही, तेच थकीत देयके मिळण्यासाठी शेतकरी आता आक्रमक भुमिकेत आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी म्हेत्रे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाइमिंग साधत शेवटी काँग्रेस भवन गाठले आहे.
ऊसाचे थकीत देयक घेतल्याशिवाय जाणार नाही.
थकलेल्या दीड लाखांच्या ऊस बिलासाठी मी काँग्रेस भवन समोर बसलो आहे. माझ्या सोबत अनेक शेतकरी विविध तालुक्यातून आणि गावातून आलेले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी म्हेत्रे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी केवळ आश्वासन मिळाले. आता रक्कम घेतल्या शिवाय जाणार नाही.
– भीमा आगलावे , ऊस उत्पादक शेतकरी.