– यंत्रमाग कामगार फेडरेशनची राज्यव्यापी बैठक संपन्न
– दोन ऑगस्ट रोजी यंत्रमाग कामगारांचे भिवंडी येथे राज्यव्यापी अधिवेशन – आडम मास्तर
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३० जून – यंत्रमाग कामगार फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवीन किमान वेतन निश्चिती नुसार १९ हजार पाचशे ९६ रुपये किमान वेतन ठरवण्यात आले आहे. मात्र राज्यभरातील यंत्रमाग कामगारांना आठ तासासाठी पीस रेटवर आधारित व ६० ते ७० टक्के कार्यक्षमतेने २६०००/- रुपये किमान वेतन निश्चित करण्याची मागणी प्रामुख्याने फेडरेशनच्या बैठकीत समोर आली आहे. त्यानुसार १० ऑगस्टपर्यंत कामगार आयुक्तांकडे हरकती नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.
किमान वेतन अधिनियम १९४८ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने १० जून २०२४ रोजी पुनर्निर्धारण करण्यासाठी सूचना ,हरकती बाबत अध्यादेश जारी केले त्या अनुषंगाने रविवार दिनांक ३० जून रोजी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे पॉवरलुम वर्कर्स फेडरेशन (सिटू) ची राज्यव्यापी बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत भिवंडी,मालेगाव,इचलकरंजी सोलापूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.नवीन किमान वेतनाच्या अधीसुचनेवर हरकती पाठवणे,यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे,यंत्रमाग कामगारांच्या घरकुलांसाठी ५ लाख रुपये अनुदान देण्यासाठी शासनाला प्रवृत्त करणे आणि २ ऑगस्ट रोजी भिवंडी येथे फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
दरम्यान भिवंडी येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली तर माकप चे पॉलिटब्यूरो सदस्य कॉ.अशोक ढवळे यांची प्रमुख उपस्थिती तर सिटू चे राज्याध्यक्ष कॉ. डी.एल. कराड हे उद्घाटक असतील. या अधिवेशनामध्ये सोलापूरसह मालेगाव,इचलकरंजी व भिवंडी येथून सुमारे एक हजार प्रतिनिधिंचा समावेश असणार आहे. यावेळी दत्ता माने (इचलकरंजी ) भरमा कांबळे (इचलकरंजी) सुनील चव्हाण (भिवंडी) तुकाराम सोंजे (मालेगाव) व्यंकटेश कोंगारी (सोलापूर ) राज्य पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत किशोर मेहता, लक्ष्मण माळी, बापू साबळे,सलीम मुल्ला,इलियास सिद्दीकी, ॲड.अनिल वासम , बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, सूर्यभान यादव, शिवमुरत पाल,अंबादास कुनगिरी,गोपाळ पोला, आनंदा वाघमोडे, बंडा पाटील, मोहन दुडम,अकील शेख,असिफ पठाण, शंकर गड्डम , अंबादास कुरापाटी, प्रशांत उंडाळे, श्रीनिवास इंजामूरी, रमेश कूणे मोहन कोक्कुल आदींनी प्रतिनिधी उपस्थित होते.