माकपचा नवा फंडा ‘व्होटभी दो, नोटभी दो’चा ; एक रुपया करणार गोळा 

माकपचा ‘व्होटभी दो, नोटभी दो’चा फंडा एक रुपया करणार गोळा 

जनतेतून उभारणार निवडणूक निधी ; २५ लाखांच्या निधीचे संकलन करणार

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ 

आगामी महापालिका पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने नवा फंडा सुरू केला जात आहे. व्होट भी दो.. नोटभी दो.. ही नवी अभिनव निधी संकल्पना उदयास आणली आहे. या योजनेचा प्रारंभ आज मंगळवारपासून केला आहे. या योजनेतून २५ लाखांचा निवडणूक निधी संकलन करणार असल्याचा मानस माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

 

आगामी महापालिका निवडणूक माकप महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे. यंदा ५० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. २० जागा लढण्याची माकपची तयारी आहे. यंदा उच्चशिक्षित, डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनीअर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. माकप गरीब पक्ष असल्याने ‘जनतेचा पैसा, जनतेसाठी राजकारण’ या भूमिकेतून व्होटभी दो.. नोटभी दो.. ही योजना राबवली जात असून, महापालिका निवडणुकीत स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख राजकारणाचा आदर्श निर्माण करण्याचापक्षाचा मानस आहे. छोट्या देणगीतून मोठा बदल घडवण्याची क्षमता या उपक्रमात आहे. लोकसहभागाच्या बळावरच लोकशाही अधिक मजबूत होऊ शकते, असा संदेश व्होटभी दो.. नोटभी दो.. योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

 

मंगळवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यासाठी माकपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एक रुपयापासून निधी संकलन करणार असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून सुमारे २५ लाख रुपयांचा निधी जनतेतून उभा करण्याचा निर्धार पक्षाने केला असून, निवडणूक खर्चासाठी पारदर्शक व लोकसहभागातून निधी उभारण्याचा हा प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

राजकीय पक्षांना लागणारा निवडणूक खर्च बहुतेक वेळा मोठ्या देणग्यांवर किंवा उद्योगपतींच्या सहाय्यावर अवलंबून असतो. मात्र व्होटभी दो.. नोटभी दो.. योजनेतून सामान्य नागरिकांनी अगदी छोट्या रकमेचा सहभाग नोंदवावा, बदल घडवा, असा या योजनेचा साधा, पण प्रभावी संदेश असल्याचे माजी आमदार आडम मास्तर यांनी जाहीर केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *