छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती उभारला भव्य स्टेज ; रॅली आणि सभेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे एक लाख पाणी बॉटल , आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि फूड पॅकेटचे नियोजन….
marathaha leader manoj-jahangir-patil-visit-at-solapur-and-conduct-huge rally and-speech-formaratha-reservation
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ५ ऑगस्ट – संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्यामध्ये दौरा सुरू करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची सोलापूर शहरातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होत आहे. त्याची तयारी सोलापूर शहरात सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती स्टेज उभारले जात आहे. तसेच परिसरात विविध ठिकाणी बॅनर, एलईडी स्क्रीन, आणि सभेचा आवाज सर्व दूर पोहोचावा यासाठी कर्णे लावण्यात आले आहेत.
दरम्यान शांतता रॅली आणि भव्यसभा या अनुषंगाने सुरक्षिततेचे दृष्टिकोनातून पोलिस यंत्रणा आणि आयोजक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समन्वय साधून प्रत्येक बाबींवर नियंत्रण ठेवले जात आहे. मनोज जरांगे यांच्या सभेसाठी सोलापूर शहर आणि जिल्हासह धाराशिव तुळजापूर आदी शहरातून मराठा बंद या ठिकाणी दाखल होतील. त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था, एक लाख पाणी बॉटलची व्यवस्था, फूड पॅकेट, आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था यांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकांना सभा पाहण्यास आणि ऐकण्यास यावी यासाठी सुमारे दोनशे कर्णे तसेच वीस एल.ई.डी. स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सभेच्या चारही दिशांना रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन आरोग्यसेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.
बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापासून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी रॅलीचे रूपांतर भव्यसभेत होणार आहे. त्याच अनुषंगाने सोलापुरात सभेचे आणि रॅलीचे नियोजन आणि तयारी करण्यात आली आहे.
– अमोल शिंदे, आयोजक मराठा क्रांती मोर्चा सोलापूर.
शहरातील विविध ठिकाणाहून तसेच जिल्ह्यातील विविध समाज बांधव एकत्रित येणार असल्याने शांतता रॅली आणि सभेच्या नियंत्रणासाठी सुमारे दोन हजारहून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी देखील विशेष नियोजन आणि तयारी करण्यात आलेली आहे.
– दास शेळके आयोजक, मराठा क्रांती मोर्चा सोलापूर.
रॅली आणि सभेसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांना असे असणार पार्किंगची व्यवस्था..
– पुणे हायवे वरून येणाऱ्या वाहनांना अवंती नगर तसेच शरदचंद्र पवार शाळा येथे पार्किंगची व्यवस्था असणार आहे..
– तुळजापूर रोडवरून येणाऱ्या वाहनांना तुळजापूर रोडवरील सर्विस रोड येथे पार्किंगची व्यवस्था असणार आहे..
– मंगळवेढा रोड वरून येणाऱ्या वाहनांना जुनी मिल कंपाऊंड आणि महापालिकेचे एक्जीबिशन सेंटर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे……
– शहरातील वाहनांना महापालिकेच्या आवारात तसेच होम मैदान या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे …….
– जी वाहने सभा आणि रॅलीच्या पूर्वी दाखल होतील त्यांना पार्किंगची व्यवस्था मिळणार आहे.
सोलापूर शहरातील मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला आणि सभेला येण्यासाठी ज्या वाहनांना उशीर होईल त्यां वाहनधारकांना आपले वाहन आहे त्याच ठिकाणीच लावून सभेसाठी यावे लागणार आहे. त्यानंतर पोलीस प्रशासन या वाहनधारकांना शहरांमध्ये प्रवेश देणार नाही असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.