संघर्ष योद्धा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क ;
शहरातील विविध शाळा महाविद्यालयांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिल्या सुट्ट्या ….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दी ६ ऑगस्ट – संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्यामध्ये दौरा सुरू करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची सोलापूर शहरातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होत आहे. त्याची तयारी सोलापूर शहरात जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सभेला येणाऱ्या मराठा बांधवांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतील ही भाव लक्षात घेऊन शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालय उद्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या सहीनिशी सदरचा आदेश तात्काळ काढण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील उद्या सर्व शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत. तत्पूर्वी शहरातील काही शाळांमध्ये अगोदरच सुट्टी जाहीर केली होती. शाळा प्रशासनाने आपल्या स्तरावर सदरची सुट्टी दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी नवीन आदेश लागू करत उद्याची सुट्टी जाहीर केली आहे.