पंढरपूर शहर व तालुका जरांगे पाटील दौरा बैठक संपन्न!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३१ – संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर दौरा सात ऑगस्ट रोजी शांतता रॅलीच्या माध्यमातून होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे फुरसुंगी मठामध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा व अखंड मराठा समाज पंढरपूर शहर , तालुक्यातील मराठा समाज बांधव या शांतता रॅलीच्या नियोजना संदर्भात आणि विचार विनिमय करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते…
यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक समाज बांधवांनी मराठा समाजाला सरसकट ५० टक्क्यामधून आरक्षण मिळाले पाहिजे असे सर्वानुमते मत व्यक्त केले गेले. यावेळी दीपक वाडदेकर, रवी मोहिते, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, किरण आप्पा भोसले, आनंद बापू पाटील ,नागेश भोसले ,, भास्कर जगताप, आनंद शिंगटे , स्वागत कदम ,किरण भोसले, अर्जुन चव्हाण ,बाळासाहेब गायकवाड, दास शेळके, मोहन चोपडे ,स्वप्निल साळुंखे ,शेखर फंड, सुनील शिंदे शेकडो समाज बांधव या बैठकीला उपस्थित होते.