संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार…छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार जाहीर सभा…..

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार….

छत्रपती संभाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज चौकापर्यंत निघणार भव्य रॅली 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार जाहीर सभा 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १४ जुलै – सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हयातील सर्व तालुके आणि शहर सोलापूर येथील प्रमुख मराठा बांधवांची बैठक आज छत्रपती शिवाजी प्रशाला येथे पार पडली…

          सदरच्या बैठकीत सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा कमिटी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असून ज्या दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची रॅलीची तारीख घोषित करतील त्या दिवसापासून जिल्हा कमिटी संपूर्ण तालुका दौरा आखला जाईल आणि घरा घरात पोहचून प्रत्येक मराठा बांधव या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे सांगण्यात आले आहे.

         या बैठकीमध्ये मोहोळ, बार्शी ,मंगळवेढा, माढा, पंढरपूर, सांगोला ,माळशिरस, करमाळा, अक्कलकोट, ता. दक्षिण आणि उत्तर  तालुक्यातून मराठा बांधव उपस्थित होते. तत्पूर्वी  बैठकीत सर्व प्रथम प्रस्तावना  करताना प्रा. गणेश देशमुख  यांनी बैठककीचा उद्देश सांगून प्रत्येक मराठा बांधव मनोज  जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागरण शांतता रॅलीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी माऊली पवार म्हणाले की जारंगे पाटील यांची दहशत संपूर्ण राजकीय लोकांना महाराष्ट्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्र जरांग पाटील यांच्या मागे उभा आहे, त्यामुळे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावाच लागेल. जर नाही केला तर लोकसभेला जसा दणका दिला तसाच विधानसभेला दाखवला जाईल असे सांगत रॅलीची सभा छत्रपती शिवाजी चौकात स्टेज मारून, छत्रपती संभाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात येणार आसल्याचे सनगितले.

             राजन जाधव यांनी शिस्त, पाळण्याविषयी मार्गदर्शन केले तर विजय राऊत यांनी बार्शी तालुक्यातून सर्वात जास्त कुणबी दाखले काढले तसेच  इतर तालुक्यातून  दाखले काढावे असे आवाहन केले, या प्रसंगी करमाळ्याचे  रामदास झोल, सचिन कदम ,उदयसिंह पाटील, महेश पवार, रणजित कदम, निर्मला शेलावने यांनी आपले विचार व्यक्त केले.

 या बैठकीत पुरुषोत्तम बर्डे, माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, राजन भाऊ जाधव, नाना काळे, श्रीकांत डांगे, प्रा. देशमुख , श्रीरंग लाले, महेश पवार, रामदास झोल, विजय राऊत, सचिन काळे, निर्मला शेलवणे, संजीवनी मुळे, मनीषा नलावडे,प्राजक्ता अजिंक्य पाटील, बाळासाहेब मोरे, प्रकाश ननवरे, नाना चव्हाण , शंभुराजे जयवंतराव जगताप, रणजीतसिंह शिंदे , शिवाजीराव चापले , रणजित कदम, प्रा. संजय जाधव, अमोल भोसले, रान साठे, अबा सावंत, उदय देशमुख, सुरेश जगताप, संजय साळुंखे, आबा नवगिरे, सौरभ साळुंखे, पिंटू माने,प्रशांत देशमुख, विश्वास चव्हाण, गणेश भोसले आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *