मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व अर्जावर तारीख पे तारीख कायम …

मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व अर्जावर तारीख पे तारीख कायम…

१४ जुलै रोजी होणार पुढील सुनावणी 

प्रतिनिधी /सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.९ जुलै 

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची पुढील सुनावणी सोमवार (ता.१४) जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. पुण्यातील एका महिलेवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायाधीश एस.वी.केंद्रे यांच्यासमोर सुनावणी होणार होती. परंतु न्यायाधीश हे रजेवर असल्यामुळे  सदरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यापुढील सुनावणी ही सोमवार (ता.१४) जुलै रोजी होणार असल्याची माहिती फिर्यादीचे वकील योगेश पवार यांनी दिली आहे.

        दरम्यान, बुधवारी मनोहर सपाटे यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. परंतु गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यांनतर माजी महापौर मनोहर सपाटे यांना जामीन देऊ नये, यासाठी फिर्यादीच्या वकिलांनी सोमवार ( ता.७) रोजी न्यायालयासमोर त्यांच्याच मुलाने म्हणजे चिंतामणी मनोहर सपाटे यांनी २०२४ रोजी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत न्यायालयात सादर केली आहे. त्याचप्रमाणे सपाटे यांच्यावर दाखल असलेले यापूर्वीचे २० गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची यादी देखील यापूर्वीच फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सादर केली होती. त्यामध्ये आता पुन्हा एका तक्रारीची प्रत न्यायालयात सादर केल्याने, सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवार (ता.१४) जुलै रोजी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मूळ फिर्यादीतर्फे अँड बी.एन. भडंगे, अँड.एन.एन. भडंगे आणि अँड. योगेश पवार तर आरोपी तर्फे अँड. शशी कुलकर्णी, यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *