“शासकीय कार्यालयास टाळे ठोकणे भोवले”
शासकीय कामात अडथळा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर, दि.३ जुलै
सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यालयात (दि.३०जून) रोजी ६:०० वाजाण्याच्या सुमारास आरोपी मल्लिकार्जुन पाटील गोंधळ घालत कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी फिर्यादी जिल्हापरिषदेचे वेतन अधिक्षक विठ्ठल दिगंबर ढेपे, वय-४९ वर्षे, रा-९०३, खंडोबा मंदिर समोर बाळे सोलापूर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात मल्लिकार्जुन पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हापरिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कुठलेही शासकीय कामकाज करू दिले नाही. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. असे फिर्यादीमध्ये म्हटल आहे. (दि.१ जुलै) रोजी पाटील यांच्या विरुद्ध ५७१/२०२५ भा. न्याय संहिताकलम १३२ प्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.