सुनील रसाळे यांच्या साटेलोटेला आम्ही तयार महेश कोठे यांची सुनील रसाळे यांच्या मागणीनंतर स्पष्टोक्ती
सुनील रसाळे हे कोठे परिवाराचे हितचिंतक कोठे परिवाराच्या उमेदवाराला सुनील रसाळे यांनी कायम मदत केली महेश कोठे
सोलापूर व्हिजन
सोलापूर गेला काही दिवसांपासून सोलापूर शहराचे राजकीय वातावरण बदललेले दिसत आहे. प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर शहर मध्य नेमके कोणाला सुटणार याकडे सर्वांचा डोळा लागलेला आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांमध्ये शहर उत्तर आणि शहर मध्य या जागेवरून कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील रसाळे यांनी शहर उत्तरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत नितसर निवेदन दिले. सध्या या निवेदनानंतर राजकीय वादळ उठले आहे. शेवटी महेश कोठे यांनी आपली चुप्पी तोडत या मोहिमेवर बोलताना सुनील रसाळे हे कोठे परिवाराचे हितचिंतक , कोठे परिवाराच्या उमेदवाराला सुनील रसाळे यांनी कायम मदत केली आहे असे सांगत सुनील रसाळे यांच्या साटेलोटेला आम्ही तयार आहोत.. कारण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष असताना देखील आम्ही तीस हजार मते घेतली त्यामुळे शहर मध्य विधानसभेच्या जागेसाठी मी पात्र असल्याचे सांगत महेश कोठे यांनी सुनील रसाळे यांच्या मागणीला चीमट्याने उत्तर दिले आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक होण्यासाठी अजून बराच कालावधी असताना आत्ता पासूनच याची रंगीत तालीम सुरू झालेली दिसत आहे. महेश अण्णांच्या स्पष्टोक्ती नंतर शहराच्या राजकारणात बदल घडतील का ? अण्णांनी देखील रसाळे यांच्या मागणीला चिमटा काढला आहे.. हे येणारा काळच ठरवणार आहे …