आगामी विधानसभेसाठी महायुती सज्ज !
विधानसभेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातून समन्वयकांची नेमणूक ..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दी. ९ ऑक्टोंबर – महाराष्ट्र राज्याची होऊ घातलेली आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, यांच्यात समन्वय रहावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये महायुती विधानसभा समन्वकांची यादी जाहीर करण्यात आली. या समन्वयकांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा तसेच विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याची मदार असणार आहे.
ज्या ठिकाणी क्लिष्टदायक परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी या समन्वयकांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या माध्यमातून सुवर्णमध्ये साधावयाचा आहे. त्यासाठीच या समन्वयकांची विशेष करून निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाचा एक सदस्य घेण्यात आला.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आनंत जाधव, शिवसेनेकडून तुकाराम मस्के, राष्ट्रवादीकडून अमोल कोटीवाले, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून शिवानंद पाटील, शिवसेनेकडून अमोल शिंदे, राष्ट्रवादी कडून आबाधीराजे, दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मनीष देशमुख, शिवसेनेकडून उमेश गायकवाड, राष्ट्रवादीकडून उज्वला पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून गणेश चिवटे, शिवसेनेकडून मंगेश चिवटे, राष्ट्रवादीकडून संजय घोडके, माढा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राजकुमार पाटील, शिवसेनेकडून प्रियदर्शन साठे, राष्ट्रवादीकडून नवनाथ माने, बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून रणवीर राऊत, शिवसेनेकडून मनीष काळजे, राष्ट्रवादी कडून अश्फाक जमादार, मोहोळ विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शहाजी पवार, शिवसेनेकडून सचिन सुरवसे, राष्ट्रवादीकडून राम साळुंखे, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शशिकांत चव्हाण, शिवसेनेकडून महेश साठे, राष्ट्रवादी कडून असलम चौधरी, सांगोला विधानसभा मतदारसंघात भाजपकडून चेतन सावंत, शिवसेनेकडून रतीभ नदाफ, राष्ट्रवादी कडून संजय मोरे, माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपकडून के के पाटील, शिवसेनेकडून राजकुमार येवरकर, राष्ट्रवादी कडून रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली..
दरम्यान समन्वयकांची निवड तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीने झाली असून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या समन्वयकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.