महायुतीच्या अनेक नेत्यांनी दिला महेश कोठे यांना पाठींबा…! महायुतीला जबर झटका, 

शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांचा महायुतीला जबर झटका, 

महायुतीच्या अनेक नेत्यांनी दिला महेश कोठे याना पाठींबा…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.७ नोव्हेंबर – विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी चुरस देखील वाढताना दिसत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हे शहर उत्तर मधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, महेश कोठे यांनी प्रचारात बाजी मारली असून ठिकठिकाणी त्यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे, वीस वर्षांनंतर शहर उत्तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विकासाचे व्हिजन असलेला महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे, त्यातच आता महेश कोठे यांना महायुतिच्या नेत्यांनी पाठींबा दिल्याने भाजप ला तगडा झटका बसला आहे.

        बाळे परिसरात दिवाळी फराळ कार्यक्रम निमित्त शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बाळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बिज्जू प्रधाने यांनी महेश कोठे याना पाठींबा देऊन महायुतीला तगडा झटका दिला आहे. मालक हे जनतेचे मालक होऊ शकत नाही आणि महेश अण्णांसारखा सेवक आपल्याला मिळू शकत नाही, असे म्हणत बिज्जू प्रधाने यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पाठींबा दिला. बाळे भागातील नेत्यांचा मला पाठींबा देण्यात कोणताही स्वार्थ नसून, विरोधाला निवडणुकीत पाडणे आता काळाची गरज असल्याचे महेश कोठे म्हणाले,

                   यावेळी सुभाष डांगे, किशोर पाटील, मारुती तोडकरी, तात्यासाहेब भवर,मदनभाऊ क्षिरसागर, आबासाहेब सावंत,नागनाथ मेंबर क्षिरसागर,युवराज सरवदे, अक्षय वाकसे,नाना गाडेकर, बापुसाहेब पाटील,सारंग पवार, प्रभाकर शिंदे,कल्पनाताई क्षिरसागर,मंजुषाताई डोईफोडे, विश्वनाथ पाटील, मोहन ढेपे,प्रकाश पाटील,आकाश भवर, बाबाराज भोसले, निशांत कांबळे,गंगाराम कल्याणकार, शिवाजी कोयाळकर,शरद मुत्तुर,यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *