मूक आंदोलनातून बदलापूर घटनेवर राज्य सरकारला महाविकास आघाडीने घेरले …..पीडित कुटुंबाला जलदगती न्यायालयातून तात्काळ न्याय देण्याची केली मागणी….

राज्यात लाडक्या बहिणीसह लाडक्या लेकी असुरक्षित 

मूक आंदोलनातून बदलापूर घटनेवर राज्य सरकारला महाविकास आघाडीने घेरले……

– मूक आंदोलनातून पीडित कुटुंबाला जलदगती न्यायालयातून तात्काळ न्याय देण्याची केली मागणी.

– मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यावर माकप देणार चॅलेंज पन्नास महिलांचा मेळावा घेऊन सरकारला विचारणार अत्याचाराचा जाब.

– बलात्कारांच्या घटनेवरून माविकास आघाडी आक्रमक अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस होते वाढ.

– राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात राज्य सरकार अपयशी.

सोलापूर व्हिजन 

सोलापूर , दि. २४ ऑगस्ट – बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्याने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण मुंबई उच्च न्यायालयात बंदच्या विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर याची केवळ आपला निकाल देताना न्यायालयाने बेकायदेशीर बंद खपवून घेतला जाणार नाही आंदोलनकर्त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा निर्णय दिला. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुकारलेला महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेत राज्यभर ठिकठिकाणी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ११ वा. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निदर्शने करत महायुती सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत हातामध्ये काळे झेंडे काळ्याफिती आणि तोंडाला कळ्या पट्ट्या लावून निषेध नोंदवला. यावेळी माजी आमदार नरसया आडम , दिलीप माने , माजी महापौर मनोहर सपाटे , माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी महापौर अलका राठोड , सुशीला आबुटे , काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजय दासरी , महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल , प्रवक्ते यु.एन. बेरिया , काँग्रेस महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे , माकप जिल्हा सचिव एम एच शेख , युसुफ मेजर , विष्णू कारमपुरी , दत्तात्रय वानकर , माजी नगरसेवक बाबा मिस्त्री , विनोद भोसले , उदय चाकोते , सुदीप चाकोते, आदींची उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी संपूर्ण तासभर तोंडाला काळीपट्टी, हातात काळा झेंडा आणि बलात्कारांना फाशी झालीच पाहिजे, असुरक्षित लाडकी बहीण, लाडक्या बहिणीसह लाडकी लेक असुरक्षित असे विविध घोषणांचे बॅनर हाती घेऊन घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

निषेध नोंदवण्याची वेळ संपल्यानंतर आघाडीतील प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला धारेवर धरले. देशात आणि राज्यात बलात्कारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे निष्क्रिय आणि निकम्मा सरकार बनलेला आहे अशा शब्दात ताशेरे ओढण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसिया अडम यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला प्रश्न उपस्थित करत बलात्कारांची संख्या आणि आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. २०२२ मध्ये साडेचार लाख महिलांवर अत्याचार घडला. तर २०२३ मध्ये सुमारे पाच लाख महिलांवर अत्याचार झाले. सरकारने काय केले. जेव्हापासून महायुती सरकार आणि भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात आले आहेत तेव्हापासून महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता परंतु या सरकारने आमचा घटनेचा अधिकार डावलून न्यायालयाचा आणि पोलिसांचा आधार घेत बंद हाणून पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही काळा किती लावून सरकारचा निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्तीसाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ५० हजार महिलांचा मेळावा घेऊन मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते यु एन बेरिया म्हणाले सध्याचे सरकार हे निकम्मा सरकार बनलेले आहे ज्या बदलापूरच्या शाळेमध्ये ही घटना घडली आहे ती घटना सरकार आणि पोलीस प्रशासन दाबण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या विरोधात साधी तक्रार दाखल करून घेतली नाही. सरकारने संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा नागरिक स्वतः रस्त्यावर आले त्यांनी हातात कायदा घेतला त्यानंतर सरकारला जाग आली आणि संबंधितावर कारवाई करत गुन्हा दाखल केला. हे असले कसले निष्क्रिय सरकार असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख अजयदास्त्री यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना जेव्हा आमचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला तेव्हा सरकारला धडकी भरली. त्यामुळे सरकारने न्यायालय आणि पोलिसा यंत्रणा हाताला धरून सदरचा बंद हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडी आणि आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काळ्याफिती लावून या घटनेचा निषेध नोंदवत सरकारला जाब विचारला आहे. हे सरकार षंढ सरकार आहे पोलीस यंत्रणेला हाताला धरून प्रकरण दाबत आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, बदलापूर मधील घडलेली घटना ही निंदनीय आहे. पीडित कुटुंबाला आणि मुलीच्या आई-वडिलांना चार दिवस नाहक त्रास आणि मानसिक छळ सहन करावा लागला. शेवटी जनतेने कायदा व सुव्यवस्था  हातात घेतल्यानंतर सरकारला हे प्रकरण आता जड जात आहे. जनतेचा रेटा कसा असतो हे यावरून सरकारला दाखवून दिले गेले आहे. त्यानंतर सरकारने संबंधित संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापूर्वी रेल्वे स्टेशनवर जमलेल्या अनेक निष्पाप जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. मुलींनी शाळेत जायचे का नाही अशी भीतीदायक वातावरण सध्या राज्यात निर्माण झाले आहे. जलद गती कोर्टामध्ये या घटनेचा लवकरात लवकर निकाल लावावा अन्यथा जनता स्वस्त बसणार नाही. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुस्लिम जमीयतचे मौलाना ताहेर बेग यांनी पाठिंब्याचे पत्र महाविकास आघाडीचे नेते यांना सुपूर्द केले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष मतीन बागवान यांनी या घटनेवरून महाविकास आघाडीला पाठिंबा देत पाठिंबाचे पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुपूर्द केले.

      यावेळी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट , आणि शरदचंद्र पवार गट तसेच महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *