महिलांनी औक्षण करून अण्णांचे केले जंगी स्वागत ! सर्वत्र घुमला एकच नारा महेश अण्णा महेश अण्णा……

शहर उत्तरमध्ये एकच वादा महेश अण्णा ; महिलांनी औक्षण करून अण्णांचे केले जंगी स्वागत…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.६ नोव्हेंबर – भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या अण्णांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांनी आपल्या प्रचार रॅलीत जोरदार आघाडी घेतली आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस करत मोठा धीर दिला आहे.

महेश कोठे नागरिकांच्या घरी जाऊन बातचीत करताना..

महेश कोठे यांचे प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. शहर उत्तर मधील विविध भागात सुवासिनी महिला औक्षण करून विजयाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे  कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत आहे.

 दरम्यान शहर उत्तर मध्ये यंदा तुतारीच वाजणार आणि महेश कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार शहर उत्तर मधील जनतेने केला आहे. बुधवारी सकाळी प्रभाग ११ मधील विविध नगरामध्ये महेश कोठे यांच्या प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

आय ग्रुप गणपती मंदिर येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली, नंतर पदयात्रा सोनिया नगर, जे ग्रुप, जे वन ग्रुप, कोटा नगर रेणुका नगर, गोकुळ नगर, समता नगर, क्षिरालिंग नगर, पिठ्ठा नगर, ब्राम्हणाय नगर, चाकोते नगर, सरवदे नगर, भारत नगर, योगेश्वर नगर, बागवान नगर, मंत्री चंडक नगर, मार्गे सुजाता नगर येथे समारोप करण्यात आला, यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, तसेच युवक आणि युवतींनी पथनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

      यावेळी मतदार यंदा आपल्यासोबत सोबत यंदा शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार आणि जनता मला भरघोस  मतांनी निवडून देणार असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *