राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार :- जयंत पाटील

महेश कोठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत व्यक्त केला विश्वास
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात जाऊन मला शंभर टक्के खात्री पटली आहे की, लोकं महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दरम्यान १० वर्षात झाले का आपले शहर स्मार्ट झाले का ? युवकांना रोजगार मिळाला का? दिलेली आश्वासने पूर्ण झालीत का? यांसारख्या अनेक शहर उत्तरच्या ज्वलंत मुद्द्यांवर प्रकाश टाकला व आपली सभा या क्रांती चौकातून होत आहे.
याच चौकातून जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन पुकारले गेले होते. याच क्रांती चौकातून शहर उत्तराच्या नवं विकासासाठी क्रांती घडवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. तेव्हा महेश कोठे सारखा दूरदृष्टी असणारा, महागरपालिकेचा अनुभव असणारा माणूस प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले.
यावेळी पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्थानिक नागरिकांना काही सवाल विचारले. यामध्ये १० वर्षात आपले शहर स्मार्ट झाले का? युवकांना रोजगार मिळाला का? दिलेली आश्वासने पूर्ण झालीत का? यासारख्या अनेक शहर उत्तरच्या ज्वलंत मुद्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. तर आपली सभा या क्रांती चौकातून होत आहे. याच चौकातून जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन पुकारले गगेले होते. याच क्रांती चौकातून शहर उत्तरच्या नवं विकासासाठी क्रांती घडवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. तेव्हा महेश कोठे सारखा दूरदृष्टी असणारा, नगरपालिकेचा अनुभव असणारा माणूस प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले. राज्यातील महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातला पळवून नेत असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला नाही. या उद्योगांच्या बदल्यात महाराष्ट्राला दुसरा मोठा प्रकल्प देण्याची हमी मोदींनी दिली होती; परंतु मोदींनी महाराष्ट्राला भोपळा देत मराठी माणसाची निराशा केली आहे.
सोलापूर स्मार्ट सिटीचा पाटलांनी घेतला समाचार
सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करून विकासाचे गाजर दाखविण्यात आले परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा पुरता बोजवारा उडाला असून, दलालीमुळे या कामाची गुणवत्ता ढासळली. त्यामुळे सोलापुरात प्रत्यक्षात स्मार्ट सिटी साकारली नाही, स्मार्ट सिटीची वाट लावणाऱ्या येथील भाजपच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवून सोलापूर शहराच्या विकासासाठी महेश कोठे यांना संधी द्या, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
विकासात महाराष्ट्र संपूर्ण देशात कायम दुसऱ्या तिसऱ्या स्थानी राहिला आहे. परंतु २०१६ पासून महाराष्ट्राची पिछाडी होत गेली असून, आज महाराष्ट्र सातव्या स्थानी गेला आहे. महाराष्ट्राच्या या अधोगतीला महायुतीचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावेळी खासदार मोहिते-पाटील यांनीही महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रचारार्थ तुळजापूर वेस येथे झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलात होते. प्रारंभी कोठे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलो. यावेळी विचारमंचावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, निरीक्षक शेखर माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, उमेदवार महेश कोठे, कॉंग्रेसचे नेते महादेव चाकोते, माजी महापौर मनोहर सपाटे, अॅड. यु. एन. बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, सिध्दाराम चाकोते, विज्जू प्रधाने, विद्या लोलगे, लता फुटाणे, सुनीता रोटे, अक्षय वाकसे आर्दीची उपस्थिती होती.