महाविकास आघाडीतील घटक पक्ष करताहेत कुरघोडी
गोंधळात गोंधळ उमेदवारीचा उडाला गोंधळ ; आघाडीत होती एका बिघाडी ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २३ ऑक्टोंबर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात धुमशान सुरू झाले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जागेवर थांब भूमिकेत दिसून येत आहे. एकीकडे सत्ताधारी महायुती पक्षातील भाजप सेना शहर मध्य साठी झगडत आहेत. तर दुसरीकडे शहर दक्षिण साठी महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धवसेनेमध्ये देखील शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

विधानसभेचा खरा खाडा आत्ता पासूनच तापू लागला आहे की काय? असा भास आता मतदारांना होत आहे. निवडणूक लागण्या अगोदरच जागा आणि तिकीट वाटपावरून गोंधळात गोंधळ सुरू आहे. गल्लीत तर गोंधळ सुरूच आहे, पण मुंबईत सुद्धा हेच चित्र दिसून येत आहे. घाई घाईने उमेदवारी जाहीर करणे आणि त्यानंतर चूक झाली असे म्हणत, परत पुन्हा एकदा यादी जाहीर केली जाईल. अशी सारवासरव महाविकास आघाडीला करावी लागत आहे. इतके दुर्दैव सध्या राजकारणात दिसून येत आहे.
सोलापूर शहर मध्य आणि शहर दक्षिण या दोन्ही मतदारसंघावरून युती आणि आघाडीमध्ये एकमेकांवर कुरघोडी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मध्य साठी सुवर्णमध्य साधने भाजप आणि शिंदे सेनेला कठोर जात आहे. तर दक्षिण मध्ये आघाडीत दक्षाची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्या अगोदरच युती आणि आघाडी एकमेकांवर जबरदस्त कुरघोडी करत आहेत त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत आणखीन तीव्रता येईल असे चित्र सध्या दिसत आहे.
जागा वाटपावरून अद्यापही तिढा कायम..
उद्धव सेनेच्या वतीने दक्षिण सोलापूर साठी अमर पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे सर्वत्र आनंदाला परावार नाही उरला. परंतु काही काळासाठीच हा आनंद होता की काय असे प्रश्न पडत आहेत. कारण काहीच काळानंतर उद्धवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या यादीमध्ये चूक झाल्याचे सांगत, पुन्हा एकदा नवीन यादी जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे ज्या ज्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे त्यांना पुन्हा एकदा टेन्शन आले आहे. आपली जागा आता पुन्हा आपल्याला मिळेल का याच चिंतेमध्ये त्यांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील जोरदार घामाचा अनु सुरू आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख नेते मंडळी अजूनही मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. जोवर मध्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. शिवसैनिक गप्प बसणार नाही अशा आरोळ्या देण्यात आल्या आहेत. उद्या शिवसेनेच्या वतीने याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.