महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ – राज्यातील पहिली साखर कारखान्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा!

महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ – राज्यातील पहिली साखर कारखान्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा!

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, १२ जुलै

सिताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५’ या राज्यातील पहिल्यावहिल्या टेनिस बॉल फुलपीच क्रिकेट स्पर्धेची पहिली पत्रकार परिषद आज दुपारी १२ वाजता हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह, सोलापूर येथे यशस्वीरित्या पार पडली.

या पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच, स्पर्धेतील सहभागी संघांची यादी, नियमावली व इतर महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली. यावेळी बोलताना मा. सुयोग गायकवाड म्हणाले,“या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. संचालक, अधिकारीवर्ग, कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडवत आहे. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता, सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल.”

स्पर्धेचा तपशील:

•उद्घाटन समारंभ: २ ऑगस्ट २०२५, हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान, सोलापूर

•स्पर्धेची सामने: ३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५, दयानंद कॉलेज मैदान, सोलापूर

•स्पर्धा स्वरूप: नॉकआऊट पद्धत

•थेट प्रसारण: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर

 

पारितोषिके:

•प्रथम पारितोषिक – ₹३ लाख

•द्वितीय पारितोषिक – ₹२ लाख

•तृतीय पारितोषिक – ₹१ लाख

•मॅन ऑफ द सिरीज – इलेक्ट्रिक स्कूटर

•सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाज – प्रत्येकी ₹५१,०००

 

या पत्रकार परिषदेला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक मा. ऋतुराज सावंत, विविध साखर कारखान्यांचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, अधिकारीवर्ग आणि सर्व २० सहभागी संघांचे कर्णधार उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

 

महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ ही केवळ एक स्पर्धा नसून, साखर उद्योगातील संघटनशीलता, मैत्रीपूर्ण वातावरण आणि औद्योगिक ऐक्याची नवी दिशा दर्शवणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *