उपमुख्यमंत्री अजित पवार खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचा जनविश्वास सप्ताह….
सोलापूर दि १९ जुलै – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य शैक्षणिक अशा अनेक उपक्रमाने जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात येणार असून हा जनविश्वास सप्ताह अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा करण्यासाठी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह शहर कार्यकारिणी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी सर्वच उपक्रम नियोजनबद्धेत आयोजित करण्यावर भर दिला आहे.
दरम्यान या जनविश्वास सप्ताह मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोलापूर विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि 20 ते 21 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पुंजाल मैदानावर भव्य बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत.दि 23 ते 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत इनडोअर स्टेडियम शेजारील मैदानावर भव्य हॅन्डबाॅल स्पर्धा होणार आहेत.दि.25 ते 26 जुलै रोजी सायं 4 ते 10 या वेळेत रेल्वे ग्राऊंड येथे भव्य बॅडमिंटन स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सोलापूर चेस अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने आणि सोलापूर जिल्हा चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने दि 21 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत फडकुले बेसमेंट सभागृहात भव्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरण्याचे शिबिर 31 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रवादी भवन येथे सुरू राहील त्याच बरोबर शहरातील विविध भागात देखील सुरू करण्यात आले आहे. विविध उपक्रमाचे नियोजन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमांना माजी आ.रविकांत पाटील, जेष्ठ नेते शफी इनामदार , प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जेष्ठ नेते आनंद चंदनशिवे , प्रदेश अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण, नागेश गायकवाड , बिज्जू प्रधाने , राजेश देशमुख , हेमंत चौधरी , श्रीनिवास कोंडी , अनिल उकरंडे, गणेश पुजारी , आनंद मुस्तारे , ॲड. सलिम नदाफ , भास्कर आडकी , बसवराज बगले, खजिनदार युवराज माने, सरचिटणीस शामराव गांगर्डे आदींची उपस्थिती राहणार आहे.