कोण कुठला ? काल आलेल्यांनी पैशांच्या जीवावर लुडबुड करू नये. :- जिल्हाप्रमुख मनीष काळजे
“ही शिवसेना निष्ठावंतांची शिंदेंची आहे ” नाकी ठाकरेंची”
प्रतिनिधी : सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २० ऑक्टोंबर – शहर मध्य मतदारसंघ हा पारंपारीक शिवसेनेचा हिदुत्व मानणारा मतदार संघ आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शींदे यांच्या माध्यमातून ५० कोटीहून अधीक रकमेची मतदारसंघात विकास कामे झाली असून ४० कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत. विकास आणी हिदुत्व यांची सांगड घालत शहर मध्य मतदार संघात आम्ही मतदारांना सामोरे जात आहोत, निष्ठावंत शिवसैनीकांच्या बळावर निवडणूकांसाठी आम्ही तयारी केली आहे. शहर मध्य मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शींदे यांनी जवळपास शंभर कोटी रुपयांचा विकास निधी दीला आहे.
मी एक शाखा प्रमुख होतो. आज सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. सर्वसामान्य शिवसैनीकाला न्याय देण्याची भूमीका मुख्यमंत्री एकनाथ शींदे यांची असून त्याबळावरच मी शहरमध्य मतदारसंघातून निवडणूकीस ईच्छुक आहे. शहर मध्य मतदारसंघात आधी विकासकामे करून नंतर मतदारांना मते मागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास आणी प्रेम या शीदोरीवरच निवडणूकीस सामोरे जाणार आहोत असे शिवसेना शींदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगीतले.
दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघावरून राज्यात तसेच स्थानिक पातळीवर जोरदार संघर्ष पहावयास मिळत आहे. अनेकांची नावे निवडणुकीची रिंगणात घेतली जात आहेत. दररोज नवीन एक नाव ऐकण्यास मिळत आहे. मात्र यावर काळजी यांनी सर्वपक्षीय विरोधकांचा खरपूस समाचार घेताना, मतदारसंघात कामे करून मत मागण्याचा शिवसैनिकांची कामाची पद्धत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे शहर मध्य मतदारसंघात केली आहेत त्याच जीवावर आम्ही मतदारांना सामोरे जात आहे. ना की काल आलेले, पैशांच्या जीवावर बेताल वक्तव्य करून राजकारणात तसेच समाजकारणात दुफळी माजवणाऱ्या व्यक्तींना मतदार त्यांची जागा दाखवेल असे सांगितले.
काल आलेल्यांनी शहाणपण शिकवू नये.
शिवसेना हा पक्ष निष्ठावंतांचा शिंदेंचा आहे. पूर्वीच्या शिवसेनेमध्ये असे आयात उमेदवार चालवले जायचे. पैशांच्या जीवावर ठाकरे यांच्या सेनेत असे मोठे बदल घडलेले दिसून आले. परंतु ही शिवसेना निष्ठावंत शिवसैनिक तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असून या ठिकाणी पैशाचा बळ चालत नाही तर विकासकामांचे बळ चालते त्यामुळे काल-परवा आलेल्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये. आमच्या पक्षांमध्ये लुडबुड करू नये. यापूर्वी ज्यांनी ज्या पक्षाचा झेंडा घेतला होता त्याच झेंड्याखाली आणि नेत्याखाली जावे. शहर मध्य मध्ये लुडबुड केल्यास सच्चा शिवसैनिक आणि मतदार त्यांना त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही.
– मनीष काळजे, शिवसेना जिल्हाप्रमुख