महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन…

महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेच राष्ट्रवादीने केले जल्लोषात स्वागत…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ एप्रिल

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यामहोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात करण्यात आले.

    पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे नातेपुते येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला. तेथे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांनी स्वागत केले. त्यानंतर माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा आणि  सोलापूर शहरात आगमन झाले. या रथाचे स्वागत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ढोल ताशे गजरात दांडपट्टा तलवारबाजी लाठी काटी या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करत सामाजिक सलोख्याच्या वातावरणात केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र रथ यात्रेचे प्रमुख  लतीफ तांबोळी यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

       दरम्यान, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचे अभिषेक जल, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अभिषेक जल पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडेय महामुनी अभिषेक जल, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शने पावन झालेली वळसंग विहिरीतील जल तसेच सोलापूरचे शहीद चार हुतात्मे यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भुमितील माती कलश भरून आणले होते. त्यांची पुजा करण्यात आली. ते सर्व जल कलश आणि पावन माती कलश महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथामधील मोठ्या दोन कलशात समर्पित केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महाराष्ट्र गौरव यात्रेचे प्रमुख लतीफ तांबोळी यांनी या यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली त्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची माहीती आजच्या युवा पिढीला व्हावी त्याकरता महाराष्ट्र गौरव महोत्सव साजरा करण्यात येत आहे अशी माहीती दिली.

    याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, हेमंत चौधरी, महेश निकंबे, चंद्रकांत दायमा, आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, प्रदेश सचिव इरफान शेख, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *