देवेंद्रजींच्या सेवा पंधरवड्यात सोलापरच्या देवेंद्रचे विशेष योगदान ; गोर गरीब गरजूंना देणार साथ

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या ५४ व्या  वाढदिवसानिमित्त होणार ५४ हजार वह्यांचे वितरण..

देवेंद्रजींच्या सेवा पंधरवड्यात सोलापरच्या देवेंद्रचे विशेष योगदान ; गोर गरीब गरजूंना देणार साथ…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २० जुलै – शहरातील  विविध  शाळेतील इ ५ वी ते १०वी शालेय  विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप या सेवाकार्य  कार्यक्रमांचे आयोजन भाजपा सोलापूर शहराच्या वतीने  करण्यात आले असल्याची माहिती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक,युवा नेते माजी नगरसेवक देवेंद्र कोठे  यांनी दिली आहे.

                    सोमवार दि.२२ जुलै  रोजी सकाळी. ११ वा. श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल  अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे श्री १००८ काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते  शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात येणार आहे.यानंतर  पुढील पंधरा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कार्यक्रम आयोजन करून वाढदिवस निमित्त सेवा पंधरवडा साजरा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *