अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी किसन जाधवांचं अजमेर शरीफ खाजा नवाज चरणी साकडं…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ – आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपल्या वाढदिनी राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्ग्यात बाबांच्या चरणी सहपरिवार साकडं घातलं तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना सुखी समाधानी ठेवो यासाठी देखील त्यांनी यावेळी खाजा गरीब नवाज दर्ग्यात नतमस्तक होऊन त्यांनी प्रार्थना केली. नुकतेच २२ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपन्न झाला. अजित पवारांना उत्तम आरोग्य लाभो,दीर्घायुष्य लाभो, अजितदादांचे जे महाराष्ट्रासाठी जे व्हिजन आहे ते व्हिजन पूर्ण व्हावे, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होवो दादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा मनात बाळगून गुरुवारी किसन जाधव यांनी आपल्या परिवारासह राजस्थान येथील अजमेर शरीफ दर्गा येथे जाऊन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी बाबांच्या चरणी प्रार्थना करून चादर चढवून दर्शन घेतले. तसेच दर्गा परिसरातील गोरगरीबांना अन्नदान वाटप करण्यात आले.
यावेळी दर्गा कमिटीचे सदस्य सय्यद इब्राहिम चिस्ती, कार्तिक किसन जाधव, पंढरपूरचे फारुक बागवान उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक आमदार घेऊन अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी इच्छा भगवंताची परिवार, सोलापूर शहरातील राष्ट्रवादी परिवार, जाधव परिवार आणि अजित दादा परिवारांसह पुनश्च एकदा अजमेर शरीफ बाबाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊ असेही यावेळी किसन जाधव यांनी बाबा चरणी प्रार्थना केली