उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस होणार विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची माहिती….
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार विविध उपक्रम
– भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन ,
– क्षय रुग्णांना सहा महिन्यांचे मोफत फूड किट
– २२ जुलै रोजी जन्म घेतलेल्या बालकांच्या नावे पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १९ जुलै – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेता संघास आकरा हजार रोख रुपये आणि ट्रॉफी, उपविजेत्या संघास सात हजार रुपये रोख आणि ट्रॉफी, उत्कृष्ट चढाई एक हजार रुपये रोख आणि ट्रॉफी तर उत्कृष्ट पकड एक हजार रुपये आणि ट्रॉफी असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. सदरच्या स्पर्धा या शनिवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून शंकर भवन उदय विकास प्रशालेच्या समोर , लिमयेवाडी सोलापूर या ठिकाणी होणार आहेत.
दरम्यान २२ जुलै रोजी रामवाडी इथल्या मनपा प्रसूतीगृहामध्ये जन्म घेतलेल्या बालकांच्या नावे पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. तसेच क्षयरोग रुग्णांसाठी सहा महिन्यांचे फूड किट वाटप करण्यात येणार आहे. अतिशय उत्साहात जल्लोषात हे कार्यक्रम साजरा करण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने , राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार , कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह शहर कार्यकारिणी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची यांची विशेष उपस्थिती असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे सर्वच उपक्रम नियोजनबद्धेत आयोजित करण्यावर भर दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली आहे.