भारतीय जनता पार्टी ऐवजी सोलापूर विधानसभेची जनता हाच माझा पक्ष – ऍड सोमनाथ वैद्य
प्रदीर्घ १९ वर्षांचा प्रशासकीय कामाचा अनुभव झोकणार विधानसभा निवडणुकीत….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २१ ऑक्टोंबर – भारतीय जनता पार्टी कडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी सोलापूर शहराच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत मागील तीन महिन्यांपासून सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधून घेतले या भागातील शेतकरी महिला युवक बेरोजगार यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. या जोरावर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. परंतु आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर होताच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपमधील सहा ते सात माजी नगरसेवकांचा पाठिंबा होता. लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून त्यांना अपेक्षा होती परंतु पक्षाने विद्यमान आमदारांवर विश्वास ठेवत त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे आता “दक्षिण सोलापूरची जनता हात माझा पक्ष” म्हणून सोमनाथ वैद्य या मतदारसंघात नशीब आजमावणार आहेत.
ऍड सोमनाथ वैद्य यांनी सामान्य जनतेसाठी राबवलेले उपक्रम…
* पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप.
* शेतकरी व गरजू महिलांना छत्री वाटप.
* जुळे सोलापूर भागात सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन.
* संत बाळूमामा मंदिर बेलाटी भक्त निवास बांधकाम सहाय्य.
* गरजू व गरीब कुटुंबास धान्य किटचे सहाय्य.
* रोजगार व उद्योग मेळावा आयोजित करून ११२ तरुणांना रोजगार उपलब्ध केला.
* कुसुर येथील अमुक सिद्ध मंदिर बांधकाम सहाय्य.
*श्रावण महिन्यात विविध ग्रामदैवत मंदिरांना महाप्रसाद आयोजक.
* बसव ब्रिगेड पुरस्कार सोहळ्याचे आयोजक.