उत्तराच्या मालकांच्या विरोधात जनतेचा वाढतोय रोष ; अण्णांना मिळतोय विजयाचा कौल !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २२ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सोलापूर शहरातील विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहर उत्तर, शहर मध्य आणि शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात चित्र बदलेल का? असे चिन्ह निर्माण झाले आहेत.
शहराच्या उत्तरात मात्र खूप मोठ्ठा प्रश्न दडलेला आहे. चार टर्म झालेले आमदार, मंत्री आपल्या विजयाचा मार्ग सुरक करणार का ? का अण्णा बाजी मारणार! असे कोडे मतदारांना पडले आहे. एकीकडे सत्ता अन् दुसरीकडे जनता असे चित्र उत्तर मध्ये दिसत आहे. आमदारकी, मंत्रीपद भोगून शहराचा विकास, कायापालट करण्याचे आश्वासन केवळ कागदावरच राहिले का ; शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपूल असेल, युवकांना रोजगार असेल, किंवा क्लस्टर योजना असेल, अशा विविध प्रकारच्या योजना अंतर्गत शहर सुजलाम सुफलाम करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. अनेक युवकांना रोजगारासाठी घराबाहेर, सोलापूर बाहेर जावे लागत आहे.
शहराच्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव सर्वत्र जाणवत आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विकास गंगा आणण्याऐवजी त्यांचा वापर योग्य पद्धतीने नियोजन न करता स्वहीत साधण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून मर्जीतील मक्तेदारला मक्ता देणे, त्यातून केवळ कागदावरच कामे केल्याचा प्रकार करणे अशा घटना वाढू लागले आहेत.
नागरिकांना पडलेले प्रश्न
– नगरसेवकांचा सुमारे लाखोंचा भांडवली निधीचा विनियोग कसा, कुठे व किती केला याची माहिती अद्यापही माहिती नाही.
– सद्या महापालिका अस्तित्वात नसल्याने नगरसेवकांनी सुचविलेले कामे होत नाहीत. त्या नगरसेवकांचा तीन वर्षांपासूनचा प्रलंबीत निधीचा उपयोग कुठे व किती केला गेला.
– आमदारांना पाच वर्षांत मिळणारा कोटींचा निधी गेला कुठे. आसे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
दरम्यान प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचार वाढीस लागला. खोटे कागदपत्र तयार करून मक्ता लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदाराला एका वर्षसाठी सुमारे तीन ते पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. परंतु त्या निधीचा विनियोग शहराच्या विकासासाठी झालेला नाही. त्यामळे शहराची जनता आणि युवक आमदारांवर नाराज असल्याचे दिसत आहे. नगरसेवकांनी सुचविलेले विकासकामे आपल्याच नावावर करण्यात धन्यता मानत आमुक कामे केली. तमुक कामे केली. असा फुगवटा केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आमदार म्हणून कार्यरत असणारे मालकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या चार टर्म पासून देशमुख आमदार आहेत. परंतु म्हणावे तसे विकास कामे मतदारसंघात झालेले दिसत नाही. युवकांना कामे नाहीत. जनतेला केवळ आश्वासन दिले जाते. उड्डाणपूल असेल किंवा क्लस्टर योजना असेल याची अंमलबजावणी करण्यात मालक अपयशी ठरले आहे का असा सवाल आता जनतेमधून उपस्थित होत आहे.
एकंदरीत जनतेचा बदलत चाललेला मूड आणि राज्यातील महायुती सरकार विरोधी वातावरण यामुळे यंदा विजय मालकांचा विजयी मार्ग काट्या कुट्याचा व अडचणीचा ठरणार असून अण्णां या संधीचा फायदा घेतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.