दक्षिण काबीज करण्यासाठी कडादी आले मैदानात ; दक्षिण मतदार संघातून भरला पक्ष उमेदवारी अर्ज तर माजी आमदार दिलीप माने यांचा झाला मोठा हिरमोड…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३० ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दक्षिण मध्ये काँग्रेसचा ए बी फॉर्म न मिळाल्याने माजी आमदार दिलीप माने यांचा मोठा हिरमोड झाला. तर दुसरीकडे सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी ही दुपारी अचानक निवडणूक कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले त्यामुळे अनेक जण चकित झाले.

काँग्रेसने गेम करत दिलीप माने यांचा पत्ता कट केला आहे. नाकापेक्षा मोती जड नको या व्यक्तीप्रमाणे शिंदे फॅमिलीने पुन्हा एकदा माने यांचा बळी घेतला की काय अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे ? तर दुसरीकडे नाही म्हणत सिद्धेश्वर परिवाराचे धर्मराज यांनी देखील आपला धर्म पाळत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
दरम्यान एकीकडे महाविकास आघाडी मधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली असताना दुसरीकडे दिलीप माने यांचे नाव यादीमध्ये आले परंतु पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला नाही असे असताना धर्मराज काडादी यांना राष्ट्रवादी काँग्रेस एबी फॉर्म कसा देईल असे संबंधित कार्यकर्ता म्हणाला.
आता दक्षिण मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी कडून अमर पाटील, काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष तसेच आता धर्मराज काडादी यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने चार नोव्हेंबर रोजी कोण माघार घेणार आणि कोण मैदानात राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.