काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर !
अक्कलकोटला सिद्धराम म्हेत्रे यांना पुनश्च संधी तर शहर मध्ये अद्याप गुलदस्त्यात तर दक्षिणेचा पेच कायम ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २४ ऑक्टोंबर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीसह महाआघाडी मधील घटक पक्षांची उमेदवारी यादी जाहीर झाली आहे.. काँग्रेस पक्षाच्या यादीकडे राज्याचे लक्ष लागले होते. सदरची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांना पुनश्च एकदा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान या यादीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली होती. परंतु त्या यादीमध्ये मित्र पक्षांच्या जागांचा समावेश झाला असल्याने सदरची यादी चुकीची असल्याची जाहीर करण्यात आले होते. तर नंतर काँग्रेस पक्षाने राज्यातील सुमारे ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
शहर मध्य अद्याप गुलदस्त्यात तर दक्षिण बाबत सस्पेन्स कायम.
सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून बाबा मिस्त्री यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु सदरच्या यादीमध्ये बाबा मिस्त्री यांचे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे शहर मध्य बाबत अद्याप सस्पेन्स कायम असून महाआघाडीत यावरून चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे विधानसभा मतदारसंघात देखील तीच परिस्थिती असून अमर पाटलांना उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर झालेले उमेदवारी थांबवण्यात आली आहे.