शहर मध्य मधून मनीष काळजे यांची माघार !
भगव्यासाठी माघार घेत आहे. शहर मध्य भगवामय करणार – मनीष काळजे
भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी घेतली काळजे यांची भेट
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आणि भाजपच्या आश्वासनानंतर भगव्यासाठी मी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले.
यावेळी देवेंद्र कोठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मनीष काळजी हे आमच्या बंधू प्रमाणे काम करतील, माहिती मध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला जाईल. भगव्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत असे सांगितले. यावेळी शहर मध्ये महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेचे महेश चिवटे, आदींसह भाजप व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.