अत्यावश्यक सेवा , अन्न-धान्य माल आणि प्रवाशी वाहतूक करणारा चालक हा देशाच्या दळणवळणचा कणा – जिल्हाध्यक्ष संतोष पवार..
चालक दिनानिमित्त १११ चालकांना चालक सेवा सन्मान पुरस्कार….
एस टी महामंडळाचे एसटी चालक, रुग्णावहीका चालक , घन्टागाडी चालक, अग्निशामक चालक ,रिक्षा चालक, मार्केट यार्डातील मालवाहतूक ट्रक चालक , यांचा विशेष चालक सेवा सन्मान…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. १८ सप्टेंबर – जागतिक वाहन चालक दिनानिमित्त विविध स्तरातील वाहन चालकांचा गौरव सन्मान सोहळा सोलापूर बस स्थानक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार मालक कामगार वाहतूक सेल आणि टी.व्हीं.एस. क्रेडिट सर्विस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी श्री गणरायाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पाहार घालून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान , मोटार वाहन निरीक्षक शितल कुमार कुंभार, बस स्थानक आगार व्यवस्थापक उत्तम झुंदळे , भारत पेट्रोलियमच्या जयश्री बोरकर , मोटार वाहन निरीक्षक कुमार तांदळे, सिद्धाराम पांढरे, चैतन्य गावडे, टी.व्हीं.एस. क्रेडिट लिमिटेड महाराष्ट्र हेड कस्तुभ देवधर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख , महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी समन्वयक शशिकला कस्पटे ,युवती अध्यक्ष किरण माशाळकर सचिव प्राजक्ता बागल सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर ज्याप्रमाणे भारताचे जवान अहोरात्र संरक्षण करत असतात त्याचप्रमाणे देशातील चालक हा देशाच्या अंतर्गत दळन वळणचा कणा आहे. अन्न धान्य त्याचबरोबर अत्यावश्यक माल वाहतूक करून तसेच प्रवाशी वाहतूक चालक हा आपले कर्तव्य बजावत असतात.आयोजक इरफान शेख यांनी या मोटार चालक-मालक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी यासाठी हा उपक्रम घेऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे या दिनानिमित्त सर्वच पुरस्कर्त्यांना शुभेच्छा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील मोटार वाहन निरीक्षक शितल कुमार कुंभार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटर चालक-मालक कामगार वाहतूक सेल यांच्या वतीने हा कार्यक्रम घेऊन मोटर चालक मालक कामगार वाहतूक यांच्या कार्याची दखल घेऊन हा उपक्रम घेतला समाजात एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला हाच आदर्श प्रत्येक राजकीय पक्षांनी , सामाजिक संघटनांनी घ्यावा असेही आवाहन केलं.
सत्कार कार्यक्रमात बसस्थानक आगार व्यवस्थापक उत्तम झुंदळे यानी आपल्या मनोगत व्यक्त करताना चालक सन्मानाच्या या उपक्रमांचे कौतुक केले बस चालक फक्त प्रवासी घेऊन जात नाहीत तर ५० कुटुंब घेऊन जात असतो त्यांना सुरक्षित घरी पोहचविण्याची जबाबदारी चालक आपले कर्तव्य म्हणून पार पाडतो अशा सर्व चालकांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्रस्ताविकेत आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार चालक मालक कामगार वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना समाज घटकात महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक. या वाहनचालकांचा सन्मान होणं आज काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन कांबळे ,अमोल माळी, हमीद बागवान, मुज्जो शेख, इमरान रंगरेज टी.व्ही.एस.क्रेडिट लिमिटेडचे विशाल इरशेट्टी अवधूत पवार संभाजी जगताप यांनी अथक परिश्रम घेतले.