बाप्पाच्या आगमनासाठी भक्तगण सज्ज ; पीओपीपासून गणेशमूर्ती  बनवण्यास सुप्रीम कोर्टाने ग्रीन सिग्नल दिल्याने मूर्तिकारांमध्ये आनंदाचे वातावरण 

गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्ती साकारण्यात श्री साई आर्ट्सचे कारागीर व्यस्त…

पीओपीपासून गणेशमूर्ती  बनवण्यास सुप्रीम कोर्टाने ग्रीन सिग्नल दिल्याने मूर्तिकारांमध्ये आनंदाचे वातावरण 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी भक्तगण सज्ज झाले असून मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना व्यस्त असल्याचे दिसत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सोलापूर शहरातील श्री साई आर्ट्स मध्ये आकर्षक असे शास्त्रीय गणपती बाप्पांची मूर्ती साकारण्यात मूर्तिकार कारागीर व्यस्त आहेत. आकर्षक असे बालगणेश विविध रूपातील गणपती बाप्पा भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. यंदाच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने पीओपीपासून गणेश मूर्ती साकारण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मूर्तिकारंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

     दरम्यान या स्पर्शभूमीवर मूर्तिकारांनी या निर्णयाचे स्वागत करताना, गणेशोत्सवाच्या एन तोंडावर हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने मूर्तिकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु हा निर्णय दोन महिने अगोदर देण्यात आला असता तर, मूर्तींचे निर्मिती वाढवण्यात आली असती. परंतु आता गणपती बाप्पांच्या मूर्तींची निर्मिती कमी प्रमाणात झाल्याने दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मूर्तिकार मधुकर क्कोकुल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,

यंदाचा गणेशोत्सव हा मोठा आनंददायी असणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने पीओपी पासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे गणेशमूर्तींचे वाढत चाललेले दर आवाक्यात येणार आहेत. तसेच मूर्तींची उपलब्धता लवकरात लवकर करता येणे शक्य होणार आहे. परंतु हा निर्णय यापूर्वी देण्यात आला असता तर मूर्तींची संख्या वाढवली गेली असती. परंतु आता कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती साकारण्याचे आवाहन मूर्तिकारांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

      विविध मुद्रेतील आणि रूपातील गणेश मूर्ती भक्तांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे अशा गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात कारागिरी व्यस्त असल्याचे दिसत आहे. मूर्तिकार बाहेरगावी पाठवल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *