लोधी समाज सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुहूर्त ठरला ; २६ एप्रिल २०२६ रोजी बांधल्या जाणार नवदांपत्याच्या रेशीमगाठी

सोलापूर व्हिजन
सोलापूर प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून लोधी समाज नवयुवक जागृती संघ सोलापूरच्या वतीने समाजाच्या विकासाच्या दृष्टीने समाजाच्या प्रगतीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.आज पर्यंत लोधी समाज नवयुवक जागृती संघाच्या वतीने २००९ पासून ते २०२५ पर्यंत सहा सामुदायिक विवाह सोहळे संपन्न झालेले आहे. यात आतापर्यंत १०८ जोडप्याने सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन रेशीमगाठी बांधल्या आहेत. लोधी समाजाच्या विवाह पद्धती जुन्या रीती परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत.
म्हणजेच सर्वप्रथम आपल्या कुलदेवताची देवघरात विशिष्ट अशी स्थापना करून लग्नाच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर वधू-वरास हळद लावली जाते तसेच रोज सकाळी सर्व नातेवाईक वधू-वराच्या आपल्या घरी एकत्र येऊन हळद लावून अंघोळ घालतात. लग्नाच्या चार दिवस अगोदर लगन लिखाई कार्यक्रम रितीरिवाज पद्धतीनुसार करतात. लग्नाच्या तीन दिवस अगोदर तेल मांडव हा कार्यक्रम होत असतो आणि लग्नाच्या एक दिवस अगोदर वरातीचा कार्यक्रम असतो. नवरदेव त्यांचे नातेवाईक मित्र सर्व मिळून नवरदेवाची वरात विशिष्ट असा शिवाजी महाराज पोशाख परिधान करून डोक्यावर शेरा मोर बांधून कमरेला कट्यार व हातामध्ये तलवार घेऊन अगदी रुबाबात घोड्यावर बसून ढोल ताशा सह गाजत वाजत आनंदाने नाचत नवरदेवाची वरात घेऊन सर्व पाहुणे मंडळी नवरी मुलीच्या घरी येतात.वरातीचे स्वागत नवरी मुलगी तांदूळ फुलांचा वर्षाव नवरदेवावर करून करते नवरदेव मुलीच्या घरासमोरील मांडवास मोठ्या लाकडाने टच करून रीती परंपरा पार पाडतात.

शेवटच्या दिवशी शुभ मुहूर्तावर अक्षदा संपन्न होतो अक्षदा हा नवरी मुलीच्या मांडवाखालीच होत असतो नवरी मुलीचे भव्य दिव्य स्टेज लाइटिंग मोठे मांडव असते जेवणासाठी आमंत्रणानुसार नियोजन केलेले असते अक्षदानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट भोजन दिले जाते. नंतर संध्याकाळी दिया सलाई व विदाईचा कार्यक्रम होतो नवरी मुलीच्या सर्व नातेवाईकांची परवानगी घेऊन सर्वांना हात मिळवून आशीर्वाद घेऊन मुलीला सासरी घेऊन जातात. जाताना जुन्या परंपरेनुसार लष्कर येथील श्री बालाजी मंदिर येथील भगवंताचे दर्शन घेऊनच घरी जातात. अशा परंपरेनुसारच लोधी समाजातिल विवाह होत असतात ही परंपरा सोडता येत नाही म्हणून या सर्व परंपरा जोपासत लोधी समाज नवयुग जागृती संघ सामुदायिक विवाह सोहळा घेत असतो सामुदायिक विवाह सोहळा रंग भवन पाठीमागील पत्रकार नगर मधील माॅ वनशितला देवी मंदिर च्या भव्य पटांगणात घेतला जातो येथे समुदाय विवाह सोहळ्यासाठी जम्बो मंडप घातला जातो तसेच सर्व जोडप्यांन साठी सेपरेट स्टेज हार फुलां व राजाराणी खुर्चीने सजवले जाते आकर्षक विद्युत लाइटिंगने मंदिर परिसर उजाळून येतो.

लोधी समाज नवयुग जागृती संघाच्या वतीने सर्व नवरे मुलांची भव्य अशी सामूहिक वरात परंपरा रीत रीवाजा नुसार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजता म्हणजेच लग्नाच्या एक दिवस अगोदर वरात निघणार आहे वरातीमध्ये पारंपारिक वाद्य व डॉल्बी सह नवरदेवांना घोड्यावर बसवून बेडरफुल लष्कर ते मुर्गीनाला कुंभार गल्ली मौलाली चौक ते जगदंबा चौक ते मॅ. वनशितला देवी मंदिर येथे येणार आहे. लग्नाच्या दिवशी म्हणजेच रविवार दि.२६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १२ वाजून २६ मी. अक्षता होणार आहे समाजाच्या समक्ष तसेच समाजाचे अध्यक्ष मुरब्बी देशातील समाजाचे नामवंत प्रतिष्ठित समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षता संपन्न होणार आहे. तसेच हजारो लोकांसाठी स्वादिष्ट जेवण देण्यात येणार आहे.
लोधी समाज नवयुवक जागृती संघचे म्हणजेच लोधी समाज समुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ गंगाराम शिवसिंगवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार लोधी समाज हा महाराष्ट्रात ओबीसी कॅटेगरी मध्ये येतो ओबीसी समाजाच्या कमीत कमीत १० नवरी मुली एखाद्या सामुदायिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन लग्न करीत असतील तर त्या मुलींना आपले शासन रुपये २५ हजार रुपये रोख देत असते म्हणून सामुदायिक विवाह सोहळा मध्ये जास्तीत जास्त म्हणजेच दहा जोडप्यांपेक्षा जास्त विवाह झाले पाहिजे जेणेकरून आम्हाला योजनेचा लाभ आमच्या ओबीसी मुलींना देता आला पाहिजे म्हणून लोधी समाज बांधवांना मी विनंती करतो की सामुदायिक विवाह सोहळा मध्ये भाग घेऊन आपल्या समाजाचा प्रगतीसाठी सहकार्य करावे तसेच विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या वधूवराचे सामूहिक साखरपुडा मोफत केला जाईल.

विवाह समितीकडून नवरी मुलीला मंगळसूत्र भांडी पैठणीसाडी तसेच नवऱ्या मुलाला सफारी कपडे दिले जाते. तसेच भव्य दिव्य अशी वरात सुद्धा समितीच्या मार्फत काढण्यात येते. अक्षता लग्नकार्यासाठी सर्व सोयीयुक्त असा जम्बो मंडप घातला जातो,तसेच कमीत कमी दहा हजार लोकांसाठी स्वादिष्ट असे जेवण दिले जाते. अशी माहिती लोधी समाज सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवशिंगवाले यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष रमेश बंबेवाले, माजी अध्यक्ष सुरेश गोर्लेवाले, उपाध्यक्ष बंजर बजरंग लंगडेवाले, सचिव गणेश मनसावाले खजिनदार -अशोक कल्लावाले , सहाय्यक सचिव- लक्ष्मण शिवसिंगवाले, रंणजीत हजारीवाले ,रवी कल्लावाले, मनोज सतारेवाले, विठ्ठलसिंग वाडीवाले, रंणजीत बुरानपुरे,हिरामण लंगडेवाले, चंचल आंबेवाले, मनोज कलबुर्गी ,मुकेश गोरलेवाले ,परशुराम सतारेवाले, राजेश शिवसिंगवाले, गोविंद पंतूवाले, गणेश बुरानपुरे,सजन बुरानपुरे, मान्यवर उपस्थित होते..

लोधी समाज सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी वधू-वर यांना प्रत्येकी 11 हजार रुपये फी घेऊन नोंदणी सुरू आहे.
नोंदणी साठी संपर्क –
रमेश बंबेवाले मो.नं.9850679941
रवी कल्लावाले मो.नं.9960732001
अशोक कल्लावाले मो.नं.9284309622