लोधी समाजाच्या वतीने विरांगणा राणी अवंतीबाई लोधी जयंती उत्साहात साजरी….
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
विरांगणा राणी अवंतीबाई लोधी ही भारताच्या स्वातंत्र पूर्व सन 1857 च्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्यामधील महान वीर योद्धा होती. वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा जन्म 16 ऑगस्ट 1831 रोजी शिवणी मध्यप्रदेश येथे झाला होता. त्यांचा विवाह रामगडचे राजा विक्रमाजीत सिंह यांच्या सोबत झाला होता. राजा विक्रमाजीत हे नेहमी आजारी असायचे म्हणून राणी अवंतीबाई यांनी राज्यकारभार सांभाळला.

इंग्रजांनी रामगड राज्य ताब्यात घेण्यासाठी युद्ध पुकारले. त्यावेळेस अवंतीबाई यांनी हजारो सैनिकांची फौज निर्माण केली आणि इंग्रजांच्या विरोधातील युद्धाचे नेतृत्व केले. भयंकर असे युद्ध झाले 20 मार्च 1858 रोजी युद्धात अवंतीबाई या वीरगतीस प्राप्त झाल्या. विरांगणा राणी अवंतीबाई या इंग्रजांसमोर झुकल्या नाही आपले राज्य इंग्रजांच्या स्वाधीन केले नाही.विरांगणा सारखे युद्ध लढले प्रसंगी मरण पत्करलं पण शरणागती पत्कारली नाही. म्हणून आज आपल्या भारताच्या इतिहासात विरांगणा राणी अवंतीबाई लोधी या अमर झाल्या आहेत.
आज ही उत्तर भारतातील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथील अनेक चौकां- चौकात अवंतीबाई लोधी यांचे मोठमोठे अश्वारूढ पुतळे उभे आहेत. या दोन्ही राज्यात अवंतीबाई लोधी जयंती निमित्त सरकारी सुट्टी ही दिली जाते. भारत सरकारने वीरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांचे पोस्ट तिकीट वितरित करून सन्मान केले आहे.म्हणून आपल्या देशाच्या महान विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती सोलापुरातील लोधी समाज बांधवांच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते.
लोधी समाज नवयुवक जागृती संघ, सामुदायिक विवाह समिती सोलापूर यांचे वतीने उत्सव साजरा करताना लोधी समाजाचे अध्यक्ष श्री भगतसिंग कल्लावाले , लोधी समाज नवयक जागृती संघाचे अध्यक्ष श्री नागनाथ शिवसिंगवाले, माजी अध्यक्ष श्री रमेश बंम्बेवाले, श्री सुरेश गोरलेवाले, श्री परशुराम सतारेवाले , श्री अशोक कल्लावाले , श्री लक्ष्मण शिवशिंगवाले , श्री गणेश मनसावाले, श्री विठ्ठलसिंग बाडीवाले , श्री सुनील मनसावाले, श्री चंचल आंबेवाले, श्री गणेश सतारेवाले , श्री रवी कल्लावाले , श्री मनोज सतारेवाले,श्री गोविंद पंतूवाले , श्री राजेश शिवसिंगवाले, श्री नितीन कजाकवाले, श्री बजरंग लंगडेवाले, श्री कुंदन मनसावाले , श्री गणेश बुर्हाणपुरे, आदी मान्यवर उपस्थित होते