लोधी समाजाच्या वतीने शितलादेवी आषाढ यात्रा उत्साहात साजरी…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
दरवर्षी यंदाही लोधी समाजाच्या वतीनें आषाढ सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. रविवार (दि.२०जुलै ) रोजी समाजाच्या वतीने आषाढ सण आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी पहाटे पासूनच शितलादेवी मंदिर, लष्कर तसेच शितलादेवी मंदिर कुमठा नाका, येथे समाज बांधव देवी मातेच्या दर्शनासाठी एकत्रित आले होते.
यावेळी भजन, किर्तन, श्रध्दाभावाने भक्तिमध्ये विलीन झाले. अनेक भक्ताकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, मुरब्बीगण, माजी आमदार शिवशरण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह राजपूत आदींची उपस्थित होते.

आषाढ सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सांय. ५ वाजता सर्व समाज बांधव एकत्रित येऊन ढोलताशा व पारंपारिक वाद्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मॉ वनशितलादेवी मंदिर, पत्रकार नगर परिसर येथे मंदिरासमोरील पटांगणात देवीचे सामुहिक महापूजा केली. या सणासाठी सोलापूरातील वनशितलादेवीची आषाढी यात्रेसाठी मुंबई, पुणे, उस्मानाबाद, कर्नाटक मधील विज़ापूर जिल्हयातील अनेक नागरीक दर्शनासी यात्रेत आले होते. यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यावेळी उपाध्यक्ष सिताराम लंगडेवाले, बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनशाम शिवसिंगवाले, लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले, माजी नगरसेवक रवी कैय्यावाले, माजी नगरसेवक भारत बडुरवाले, माजी नगरसेविका जुगनबाई आंबेवाले, वनशितलादेवी ट्रस्टचे रणजित दवेवाले, मुरब्बीगण, विठ्ठलसिंग शिवसिंगवाले, राणोसिंग सतारेवाले, किसन कजाकवाले, मानसिंग कोलाकाटी आदींची उपस्थिती होती.
