अत्यंत चुरशीच्या सामन्यात लोधी समाज चषकाचा मानकरी ठरला जय दंडेहनुमान क्रिकेट संघ
तर जय विजय क्रिकेट संघाचा केला चार गडी राखून पराभव
विजेत्या संघासह उपविजेत्या संघाला रोख रक्कम बक्षीसचे वितरण ….


सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे लोधी समाजाच्या वतीने माॅ शितला देवी आषाढ यात्रा महोत्सवानिमित्त लोधी समाज क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कुमठा नाका येथील क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.या स्पर्धे मध्ये एकुण १९ संघांनी सहभाग घेतला होता. (दि.१५ जुलै) पासून स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धेची दोन्ही उपांत्य फेरी व अंतिम सामना गुरुपुषामृतच्या शुभ मुहूर्तावर गुरूवार( दि.२४ जुलै ) रोजी पार पडला.अंतीम सामना जय विजय संघ व जय दंडेहनुमान संघ यांच्यामध्ये रंगला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात जय दंडेहनुमान संघाने चार गडी राखून विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मैदानात गर्दी केली होती. प्रथम विजेतेपदास रु १५०००/- बक्षीस युवा कार्यकर्ते बजरंग पैलवान बोधीवाले व चषक लोधी समाज नवयुवक जागृती संघ सामुदायिक विवाह समिती च्यावतीने प्रमुख मान्यवर जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड लोधी सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

मॅन ऑफ द मॅच- श्री सुनील मनसावाले, मॅन ऑफ द सिरीज – श्री राज सकी, बेस्ट बाॅलर व परफॉर्मन्स विजय पंतुवाले यांना मिळाले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड, लोधी समाज नवयुवक जागृती संघ सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले, युवा कार्यकर्ते बजरंग पैलवान बोधीवाले,माजी अध्यक्ष रमेश बंबेवाले, सुरेश गोर्लेवाले, अशोक कल्लावाले, लक्ष्मण शिवसिंगवाले, विजय बाबावाले आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, स्पर्धेत द्वितीय पारितोषिक उपविजेते जय विजय क्रिकेट टीम यांना रु ७०००/- बक्षीस श्री बजरंग पैलवान बोधीवाले व चषक लोधी समाज नवयुवक जागृती संघ सोलापूर सामुदायिक विवाह समिती च्यावतीने माजी अध्यक्ष रमेश बंबेवाले व सुरेश गोर्लेवाले आणि युवा कार्यकर्ते बजरंग बोधीवाले यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी नागनाथ शिवसिंगवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज सुधारण्याची क्षमता फक्त युवक व तरूणांमध्ये आसुन सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त समाज बांधवांनी भाग घेऊन सामाज हितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यांनी केले.
सदरच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील मनसावाले, मनोज लंगडेवाले, रोहित सतारेवाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमर शिवसिंगवाले यांनी केले. तर आभार मनोज लंगडेवाले यांनी मानले.