स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वलस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ जून
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अव्वल स्थानी राहील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून कार्य करत रहा. हाच सर्व सामान्य नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधाराशी जोडला गेला पाहिजे. सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष बळकटीसाठी सभासद नोंदणी अभियान राबवावे असे देखील पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, महादेव राठोड,आनंद गाडेकर यांच्यासह पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.