लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाने केला सत्कार ; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा….!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १३ ऑगस्ट – अखिल भारतीय लाड समाज सामाजिक आणि संशोधन संस्था सोलापूर यांच्यावतीने लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ कार्यक्रम कन्ना चौक येथील येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब महाराज मठाधिपती नंदेश्वर हे होते. तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डॉ.किरण देशमुख यांच्याहस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा व समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा कार करण्यात आला यावेळी डॉ. किरण देशमुख, बाळकृष्ण महाराज यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण लाड बीड विभाग अध्यक्ष एकनाथ लाड पुणे विभाग अध्यक्ष रवी लाड महिला अध्यक्ष जया मधुरे दक्षिण सोलापूर अध्यक्ष गोवर्धन लाड सचिन लाड यांची उपस्थिती होती यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम केले दहा ते बारा वर्षा पासून राबवला जातो यामध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम करण्यासाठी अमित लाड किरण सगेल रोहित लाड सिद्धाराम झेडेकर अमित बेदरकर दिनेश तावस्कर राजन लाड गजेंद्र लाड श्रीधर सगेल मानतेस झेंडेकर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.