बहिणीसोबत जातानाच मृत्यूने मारली झडप…भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला…

‘भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे’; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला…

बहिणीसोबत जातानाच मृत्यूने मारली झडप

मृत योगीराजने याच ढिगाऱ्याखाली आपला जीव सोडला…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी

रिमझिम पाऊस सुरू होता. ११ वर्षांचा योगीराज आपल्या लहान बहिणीसोबत छोट्या गल्लीतून जात होते. त्याचवेळी भिंत कोसळली आणि नको तेच झालं…योगीराजवर काळाने झडप घातली सर्वत्र आक्रोश अन् हंबरडा असा आर्त टाहो चिमुकल्या आई वडिलांसह नातेवाईकांनी फोडला. मन हेलवणार आणि दृष्य पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कड्या पाणावल्या..

गावातील नवरात्र मंडळाचे पूजन करून आई-वडिलांसमवेत घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. बारीक सरी सुरू असल्याने भावंडे छत्री घेऊन बोळातून जात होती. इतक्यात अचानक भिंत कोसळली. योगीराज ढिगाऱ्याखाली चिरडला गेला, तर जागृतीही अडकली. जीवघेण्या क्षणी ती आक्रोश करत होती. “माझ्या भैय्याला आधी काढा… तो आत अडकला आहे. नागरिकांनी धडपड करत तिच्या अंगावरचे दगड-माती दूर करून बाहेर काढले. मात्र, तिचा पाय मोडला आणि अंगावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर योगीराजला बाहेर काढले असता, डोक्याला झालेला जबर मार आणि गुदमरल्याने त्याने जागीच प्राण सोडले होते.

योगीराजचा मृतदेहच सापडला

निष्प्राण शरीर पाहताच आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. गावातील लोकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पावसाने कोवळा जीव हिरावून नेला. हेंबाडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते शेजारच्या घरात राहत होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *