संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी मार्गातील त्या लोखंडी खांबाचे विघ्न टळले !
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर हाईट बॅरिकेटिंग बसवणार – सोलापूर रेल्वे व्यवस्थापक नीरज दोहरे
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १० जुलै – गजानन महाराज यांची पालखी शुक्रवार दि. १२ जुलै रोजी भय्या चौक ते मरीआई चौक येथुन तिरे मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्याने त्यामार्गावरील असलेला लोखंडी पोल पहाटे सकाळी ६ वाजता काढणार असल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांनी दिली.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या मागणीला आणि सोलापूर व्हिजनने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या वृत्तसंकनाला यश आले आहे. दि.२ जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांना भय्या चौक येथील लोखंडी पोल काढण्यात यावे अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने लोखंडी पोल बाजूला करून पालखीचा मार्ग मोकळा करून देऊ असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
दरम्यान सोलापूर व्हिजनने देखील वेळोवेळी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचीच दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. यामुळे संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज यांच्या पालखीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहाटे सहा वाजता लोखंडी पोल काढून हाईट बॅरिकेटिंग बसवण्यात येणार आहे. यावेळी सीआरपीएफचे ५० जवान त्याठिकाणी तैनात करणार आहे अशी माहिती रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांनी दिली असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख गणेशकर यांनी दिली. मरीआई चौक येथे पालखीला येणारा अडथळा शिवसेनेने दूर केल्याने आणि पालखी मार्ग मोकळा होत असल्याने स्थानिक नागरिकांनी आणि गजानन महाराजांच्या भक्तांनी आभार व्यक्त केले आहे.