बेकायदा जागा बळकावणार्या शिवसेना पदाधिकार्यावर गुन्हा…
टोळीत दहा जण – चौकशीसाठी सुजीत खुर्द पोलिसांच्या ताब्यात इतर आरोपींचा शोध सुरू…
सराईत गुन्हेगार अर्जुन सलगरचाही समोवश
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दी.०३ ऑक्टोंबर – राजकीय वरदहस्त असलेल्या सोलापुरातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्याने गुंडाच्या मदतीने बेकायदा जागा बळकावली. याप्रकरणी त्याच्यासह दहा जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यात सराईत गुन्हेगार अर्जुन सलगरचाही समोवश आहे. दरम्यान शिवसेना (शिंदे गट) युवासेनेचा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुजित खुर्दला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत रुपाली संदिप वाडेकर (वय ३४, रा. उत्तर कसबा, चौपाड,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.विजयकुमार वासुदेव आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे (सर्व रा. सोलापूर) व इतर पाच जणांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादी यांच्या पतीची वडीलोपार्जित जागा नवीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज रोडवर आहे. त्या जागेत वेल्डिंगचे वर्कशॉप आहे. एकून ९६०फूट जागेपैकी ३७० फूट जागा फिर्यादीच्या नातेवाईकांनी विक्री केली.
तर उर्वरित जागा ही त्यांच्या मालकिची आहे. २८ जुलै रोजी फिर्यादीचे सासरेर मोहन वाडेकर हे जागेवर गेले, तेव्हा त्यांना त्यांच्या जागेतील पत्र्याचं शेड, पूजा हॉटेल व गुलमोहराचे झाड कोणीतरी पाडून आतील साहित्य चोरल्याचे लक्षात आले. ही बाब समजताच, फिर्यादी या पतीसह जागेवर गेल्या. त्यावेळी तेथे केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे व इतर पाचजण दिसून आले. त्यांच्याकडे जागा आणि त्यातील साहित्याविषयी विचारणा केली. त्यावर अर्जुन सलगर याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच यापुढे येथे पाय ठेवाल तर दोन्ही पाय तोडीन अशी धमकी त्याने देऊन हाकलून दिले. यानंतर पत्र्याचे कंपाऊंड करून आरोपींनी जागेचा बेकायदा ताबा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.
सलगरच्या नावावर १४ गुन्ह्यांची पोलिसात नोंद
जागा बळकाण्याच्या गुन्ह्यात असणारा गुंड अर्जुन सलगरविरूध्द पोलिसात वेगवेगळ्या प्रकारच्या १४ गुन्ह्याची नोंद आहे. त्यामध्ये खंडणी मागणे, बेकायदेशीर जागा बळकावणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर एकवर्ष स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याने २०१९ मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढली आहे. तसेच यातील दुसरा गुन्हेगार सुजित कोकरे विरूध्दही पोलिसात गुन्हे दाखल आहेत.