क्रेडाई सोलापूर शाखे तर्फे  प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन – दि. २० डिसेंबर रोजी उद्घाटन

क्रेडाई सोलापूर शाखे तर्फे  प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन – दि. २० डिसेंबर रोजी उद्घाटन !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१७ डिसेंबर

क्रेडाई सोलापूर तर्फे  प्लॉट,फ्लॅटस्, रो हाऊझेस् , बिल्डिंग मटेरियल  सप्लायर्स , वित्तीय संस्था इत्यादीचे प्रदर्शन यंदा दि. २० ते २३ डिसेंबर दरम्यान नॉर्थ कोट हायस्कुल ग्राऊंड येथे आयोजीत  करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष श्री. अभय सुराणा यांनी पत्रकार परीषदेत दिली. याचे उद्घाटन शुक्रवार २० डिसेंबर रोजी स. १०.३० वा.   सौ. शीतल तेली- उगले मैडम आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांच्याहस्ते, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनिल फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली कोठारी पाईप्स्चे व्यवस्थापकीय संचालक उज्वल कोठारी् तसेच  क्रेडाई नॅशनलचे सभासद शाखा  विस्तार समितीचे चेअरमन शशिकांत जिड्डीमनी, यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न होणार आहे.

सोमवार दि. २३ डिसेंबर  पर्यंत दररोज  स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे.  क्रेडाई सोलापूर आयोजीत या प्रदर्शनाचे कोठारी प्ल्मबींग पाईप्स् हे प्लम्बिंग पार्टनर आहेत. यंदाच्या प्रदर्शनात सुमारे ६५ स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्,फ्लॅटस्, बंगलोज्, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल  सप्लायर्स , वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आर्कि. विरल उदेशी यांनी दिली. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रदर्शनात  रविवार दि. २२ डिसेंबर रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्या वतीने  रक्तदान शिबीर आयोजित करण्यातआल्याची माहिती दिली.

क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे व स्वत: वर व्यवसाईक बंधने पाळून कार्य करणारी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते. ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या  जातात. क्रेडाई सोलापूर द्वारे रक्तदान शिबीर , कामगारांसाठी विविध शिबिरांसह  वृक्षारोपण, सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले जातात अशी माहिती दिली.

वुमन्स विंग व युथ विंग –  क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण  , शैक्षणिक दौरा , सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. या पत्रकार परीषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष आनंद पाटील, सचिव  संतोष सुरवसे,  खजिनदार राजीव दिपाली,  माजी अध्यक्ष किशोर चंडक, प्रदीप पिंपरकर आदी उपस्थित  होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *