सोलापुरात ओणम सण उत्साहात साजरा ; पारंपारिक वेशभूषा आणि खाद्यसंस्कृतीने वेधले लक्ष…
सोलापुरात गुण्या गोविंदाने राहतात केरळी बांधव – अध्यक्ष गिरीश स्वामी
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरात केरळी बांधवांनी एकत्र येऊन रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी सुरभी हॉल,विजापूर रोड येथे ओणम सण उत्साहात साजरा केला. सालाबाद प्रमाणे केरळ राज्यात दि.५ सप्टेंबर रोजी ओणम सण साजरा करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर केरलाईटस असोसिएशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी असोसिएशनचे सोलापूरचे अध्यक्ष गिरीश स्वामी, हरी कुमार, शिवण कुट्टी, अनिल बालन, सुरेश नायर आदींनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सोलापुरात देखील ओणम हा उत्सव साजरा करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घेतला. गेल्या कित्येक पिढ्यांपासून केरळ राज्यातील काही नागरिक सोलापुरात स्थायिक झालेले आहेत. या सर्व केरळ बांधवांनी आपली पारंपरिक केरळ येथील लोककला सादर केल्या. तर महिलांमंडळांनी केरळी पद्धतीचा पारंपरिक पेहराव केला होता. यावेळी सर्वत्र फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. केरळी पद्धतीचं स्वादिष्ट जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.