लाडकी बहीण योजना लागू केल्याने सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या युवती मंडळाने केली कृतज्ञता व्यक्त…
सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि. २१ ऑगस्ट – सोमवंशी क्षत्रिय समाज युवती प्रतिष्ठान संस्थेच्या महिला सभासदांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना १० फुटी राखी पाठवली आहे. सदरचा अनोखा उपक्रम राबविल्याने मंडळांचे कौतुक होत आहे.
समाजातील प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनाद्वारे दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळत आहे. रक्षाबंधन दिवशीच या योजेनेचे निधी बँक खात्यात वर्ग झाल्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केल्यामुळे सरकारचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय युवती प्रतिष्ठान तर्फे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना मोठी राखी पाठवत महिलांसाठी विविध योजना राबवत महिला सक्षम करत असल्याबद्दल महायुती सरकारचे आभार मानले .
समाजाच्या वतीने केले जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोमवंशीय क्षत्रिय समाज युवती प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवला आहे. याव्यतिरिक्त प्रतिष्ठानच्या वतीने संस्कार वर्ग , व्याख्यानमाला आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच श्रावण महिन्यात क्षत्रिय गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात ५६ भोग महाप्रसाद आयोजित केला जातो.
– सुनीता पवार , खजिनदार सोमवंशीय क्षत्रिय समाज युवती प्रतिष्ठान सोलापूर.