ईच्छा भगवंताची परिवार आयोजित अजित दादा चषक निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद…

स्पर्धेचे शानदार उद्घाटन स्पर्धेमध्ये ७०० पुरुष तर २०० महिला खेळाडूंचा सहभाग
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक संस्थेचे आधारस्तंभ माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजित चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे (मॅटवरील) आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदाम जवळील जांबवीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख, मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, सिद्राम कामाटे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, नवयोग तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळवे, लक्ष्मण सरवदे राजू आसादे, महादेव हुच्चे, मारुती दिवटे, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड, संतोष जाधव, कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव मेंबर, आदींच्या उपस्थितीत क्रीडांगणाचे विधिवत पूजन करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला. नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आले. या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये ५० संघांनी सहभागी नोंदवला. त्यामध्ये ७०० पुरुष तर २०० महिला खेळाडूंचा समावेश होता.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन (५०लाख) आणि मोची समाजाचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जांबमुनी महाराज सांस्कृतिक भवनाचे (५०लाख ) भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सितारामजी कामाटे, मोची समाज जनरल सेक्युरिटी नागनाथ कासलोलकर, मोची समाज उपाध्यक्ष लष्कर विभागीय अध्यक्ष अर्जुन सावळे नवयुग जांबवीर अध्यक्ष राजू असादे, दत्ता शिंगाडे सेक्युरिटी ओसेना पावलापल्ली, श्रावण कुमार गायकवाड,गोपाल कुमार, चंद्रशेखर माशाळकर ,नारायण नरसिंग बादल, यमापा बादल, तिरुपती जिंगेकर, सय्यद शासन, मार्तंड तूडोळकर, संजय केरकर, शेत्र माडेकर, हुलगप्पा शासम गवळी व मोची समाजातील बांधवांची उपस्थिती होती.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ईच्छा भगवंताची मित्रपरिवारची पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव यांनी सांगितले.