भयानक ! जुळे सोलापुरात युवकाचा जबर खून ; डोक्यात दगड घालून केला खात्मा

जुळे सोलापुरात युवकाचा दगड घालून खून : मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना ; भयानक घटनेने सर्वत्र खळबळ 

सोलापूर दि.१ जुलै : जुळे सोलापूरातील कल्याण नगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल होत पंचनामा करीत आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खून झाल्याचे सांगितले जात आहे.

                        दरम्यान अविनाश हाक्के वय 25, सध्या रा. कल्याण नगर भाग एक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कल्याण नगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली आहे. डोक्यात दगड घालून खून झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त परमार तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड  हे घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. युवकाची आजी येऊन तिच्याकडून ओळख पटली असून लादेन यांची ॲम्बुलन्स बोलवण्यात आली आहे.

नागरिकांकडून सदरची माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू पित बसतात, रात्री नागरिक जातात येतात, महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी आहेत. सदरचा खून कोणत्या कारणावरून झाला आहे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र दारू पिल्यानंतर वादविवाद होऊन सदरची घटना घडल्याचे स्थानिक नागरीकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *