मीनानगर परिसरातील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग मोकळा …

मीनानगर परिसरातील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग मोकळा 

प्रभाग २६ मध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याने नागरिकांना  मिळणार समस्यातून दिलासा 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोस्थान योजने अंतर्गत जुळे सोलापूरातील मीना नगर परिसरात ड्रेनेज लाईनचे काम झाल्यानंतर सदर नगरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून सोमवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

जुळे सोलापूरातील प्रभाग क्रमांक २६ मधील मीना नगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोई सुविधापासून वंचित राहत आहेत. महानगरपालिकेच्या तिजोरीत कर भरून सुद्धा त्यांना मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज लाईन,अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती असे अनेक प्रकारचे गरजा पूर्णपणे बंद होत्या. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण या २०१७ रोजी निवडून आल्यानंतर तेथील जागरूक नागरिक प्रकाश चव्हाण यांनी सदर मीना नगर मधील विविध समस्या बाबतीत नगरसेविका राजश्री चव्हाण यांना समस्या सांगितल्यानंतर प्रथम प्राध्यान्याने तेथे पाण्याची पाईपलाईन करण्यात आली.

आम्ही सदर नगरामध्ये सुमारे २० वर्षापासून वास्तव्यास असून आम्ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये कर भरतो. परंतु आम्हाला महापालिकेकडून कुठल्या सोयी सुविधा म्हणाव्या तशा मिळालेल्या नाहीत. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर तातडीने आमच्या समस्या सोडविल्या आहेत व उर्वरित राहिलेले दिवाबत्ती लाईट लवकरात लवकर चालू करून देण्यात यावे व राहिलेले उर्वरित काम हे तुम्हीच करू शकता ही आम्हाला शाश्वती आहे असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सदर नगरातील प्रकाश चव्हाण,रमेश रजपुत,रुपेश राठोड,शशिकांत शिंदे,साहिल चव्हाण, बिराप्पा बिराजदार,रेखा चव्हाण,अंबिका बंडगर,लंगोटे ताई,पवार ताई,प्रशांत काळे,ठेकेदार अलकुंटे तसेच नागरिकांच्या मदतीला सदैव धावून येणारे भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *