माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा यशस्वी पाठपुरावा…

प्रभाग क्रमांक २६ मधील द्वारका नगर मधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा पाठपुरावा…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये द्वारका नगरमध्ये सुमारे २० ते २५ वर्षापासून नागरिक टॅक्स भरून सुद्धा त्यांना महापालिकेकडून कुठल्याच सोयी सुविधा मिळत नव्हत्या त्यामुळे नागरिक अनेक नागरिक सुविधा पासून वंचित होते. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण या निवडून आल्यानंतर प्रथम  पाण्याची पाईपलाईन व नंतर ड्रेनेजचे काम करून देण्यात आले होते.

डावरे कॅन्टीन ते गुरुदेव दत्त नगर भाग पाचला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झालेला होता तेथे चालणे सुद्धा मुश्किल झाले होते नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून शासनाच्या नगरोस्थान योजनेतून सदर रस्त्याचे काम करून दिल्याने अनेक नगरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून रस्ता झाल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

   पावसामुळे द्वारका नगर मध्ये अंतर्गत रस्ते नसल्यामुळे नागरिकांना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत होते प्रसंगी आपली वाहने डांबरी रोडवर लावून चालत घरी जायची वेळ आली होती. यासमस्या बाबत द्वारका नगर मधील जागरूक नागरिक म्हणून संबोधले जाणारे जाधव मेजर यांनी ही बाब नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्राध्यान्याने तेथे मुरूम उपलब्ध करून दिला होता.

   परंतु झोन पाच कडील जेसीपी नादुरुस्त असले बाबत झोन पाच कडील अधिकारी यांनी कळविले ही बाब सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ.श्री सचिन ओंबासे यांना सदर समस्या बाबत सांगितल्यानंतर तातडीने आपत्कालीन कार्यालयाकडून जेसीबी उपलब्ध करून दिला व जेथे जेथे पाणी साचलेले आहेत तेथे मुरूम टाकून जेसीपीने पसरवून घेऊन रस्ता व्यवस्थित करून दिला.

 त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला व तेथील अंतर्गत रस्ते लवकरात लवकर करून देण्याबाबत विनंती केल्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब यांना सदर समस्या बाबत लेखी निवेदन दिलेले असून लवकरच सदर नगरातील अंतर्गत रस्त्यातील कामे दिवाळीच्या आत होतील असे ठोस आश्वासन दिले आहे.तातडीने समस्या सोडवल्याबद्दल नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.

     याप्रसंगी नगरातील विजय कांबळे, जाधव मेजर, निवृत्त पोलीस अधिकारी भासकी, रमेश गायकवाड, शिवाजी चव्हाण स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *