प्रभाग २६ मधील विष्णूपुरी येथे पाण्याची पाईपलाईन कामाचे उद्घाटन…!
नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १८ ऑक्टोंबर – सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र २६ मधील विष्णूपुरी येथे गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी येथे कोणतीच विकासकामे केले नाहीत. केवळ मत मागण्यासाठी नगरात यायचे, खोटे नाटे आश्वासन देऊन निघून जायचे. असा प्रकार वारंवार घडल्याने तेथील नागरिक वैतागले होते.
दरम्यान २०१७ साली सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर प्रथम विष्णूपुरी सोसायटीतील पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, प्रमुख रस्ता,अंतर्गत रस्ते प्राधान्याने करून दिले होते. तसेच विष्णूपुरी नगरातील गणेश मंदिर यांचे सुशोभीकरण करून देण्यात आले होते. उर्वरित नऊ ते दहा घरांसाठी पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे तेथील नागरिकांनी सातत्याने नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे निवेदने दिले होते.
दरम्यान त्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते. ल शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन काम मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सदर नगरामध्ये राहत असून आम्हाला कुठल्याच सुविधा मिळत नव्हत्या. कर भरूनही सोयीसुविधा मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी निवडून आल्यानंतर प्राध्यान्याने आमचे नगरातील पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज, प्रमुख रस्ते , अंतर्गत डांबरी रस्ते, दिवाबत्ती, गणेश मंदिराचे सुशोभीकरण आदीं विकासकामे करून आमच्या नगराचा कायापालट केला आहे.
याप्रसंगी विश्वास जाहागीरदार, सुहास कुलकर्णी, बाळासाहेब खटाळ, शुभम चिकोळी, शिवानंद पाटील, सिद्धाराम बिराजदार, गुरु आवटगी, पोतणीस काका, रोहित रुपनर, सचिन शिंदे, शुभम बिराजदार, भाजपचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, ठेकेदार सोनी हे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.